यंदाच्या 18व्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) रोजी होणार आहे. दरम्यान शुभारंभ सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघातील हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. तत्पूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) केकेआरच्या कर्णधारपदी निवड झाली आहे, तर व्यंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) उपकर्णधारपदी निवड झाली आहे..
View this post on Instagram
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आगामी 2025च्या आयपीएल हंगामासाठी अजिंक्य रहाणेला त्यांचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रहाणेला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा दीर्घ अनुभव आहे. तो यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार होता. गतविजेत्या कोलकाताने व्यंकटेश अय्यरची उपकर्णधार म्हणून घोषणा केली आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने फायनल सामन्यात सनरायझर्स हैदराबादला (SRH) हरवून विजेतेपद पटकावले होते. आता अय्यर संघात नाही. यंदाच्या हंगामात तो पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसेल.
कर्णधार झाल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला, “आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या केकेआरचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा सन्मान आहे. मला वाटते की आमच्याकडे एक उत्कृष्ट आणि संतुलित संघ आहे. मी सर्वांसोबत काम करण्यास आणि जेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान स्वीकारण्यास उत्सुक आहे.”
केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, “अजिंक्य रहाणे सारखा अनुभवी आणि परिपक्व कर्णधार मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. तसेच, व्यंकटेश अय्यर केकेआरचा फ्रँचायझी खेळाडू आहे आणि त्याच्यात अनेक नेतृत्वगुण आहेत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमच्या जेतेपदाच्या बचावाची सुरुवात करताना ते चांगले संघटन करतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा कर्णधार म्हणून किती यशस्वी? जाणून घ्या संख्यांमधून
Champions Trophy: ऑस्ट्रेलियाची ताकद रोहितला माहिती, सेमीफायनलपूर्वी सांगितला प्लॅन!
भारतीय संघ चॅम्पियन्स होऊ शकतो पण, माजी खेळाडूंनी काय सांगितला फॉर्म्युला ?






