राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दणदणीत विजय मिळवला. यशस्वी जयस्वाल या सामन्याचा हिरो ठरला. जयस्वालने अवघ्या 13 चेंडूत आपले अर्धशतक केले. अवघ्या 2 धावा कमी पडल्याने जयस्वालचे शतक हुकले. केकेआरचे होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर राजस्थानने 9 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानने 13.1 षटकात 150 धावांचे लक्ष्य गाठले.
राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट राडयर्सने 20 षटकांममध्ये 8 बाद 149 धावा कुटल्या. यात वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याचे योगदान सर्वाधिक 57 धावांचे होते. वेंकटेश अय्यरने 42 चेंडूत 57 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने हे लक्ष्य 13.1 षटकात गाठले. सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal ) 47 चेंडूत 98 धावा करून नाबाद राहिला. तर कर्णधार संजू सॅमसन याने 29 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या.
राजस्थानचा एकही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही. जोस पडलर आंद्रे रसल याच्या डायरेक्ट हिटवर धावबाद झाला. बटलरा आपले खाते खोलता आले नाही. दुसरीकडे राजस्तानसाठी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ड याने 2, तर संदीप शर्मा आणि केएम आसिफ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. युझवेंद्र चहल या सामन्यातील प्रदर्शनानंतर सर्वाधिक आयपीएल विक्रम घेणारा गोलंदाज बनला. त्याच्या नावावर आता 187 आयपीएल विकेट्सची नोंद आहे. 183 विकेट्स घेणारा ड्वेन ब्रावो यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
दुसरीकडे जयस्वालच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. जयस्वाल आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज बनला आहे. त्याने गुरुवारी (11 मे) अवघ्या 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नवा विश्वविक्रम केला. याआदी केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर आयपीएलचे सर्वात वेगवान अर्धशतक होते. या दोघांनीही प्रत्येकी 14-14 चेंडूत आर्धशतके केली होती. पण जयस्वालने हा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे.
गुणतालिकेचा विचार केला, तर राजस्थान रॉयल्स या विजयानंतर थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आपल्या 12 पैकी 6 सामने राजस्थानने जिंकले आहेत. राजस्थान अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पण दुसरीकडे केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. केकेआरने 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत 7व्या क्रमांकावर आहे. (KKR lost by 9 wickets to Rajasthan Royals at Eden Gardens)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING । 21व्या वर्षी जयस्वालने रचला विक्रम! ठोकली IPL इतिहासात सर्वात वेगवान फिफ्टी
KKRच्या कॅप्टनवर 21 वर्षीय जयसवाल पडला भारी! पहिल्याच ओव्हरमध्ये जाम धुलाई करत रचला रेकॉर्ड