आगामी आयपीएल (IPL) हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या नव्या नियमांनुसार आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएलच्या 18व्या हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी 6 खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये रिंकू सिंह, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमणदीप सिंहच्या नावाचा समावेश आहे. पण केकेआरने आपला कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कायम ठेवले नाही.
अशा स्थितीत आगामी आयपीएल हंगामात केकेआरलाही नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे. त्यामुळे या बातमीद्वारे आपण अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे 2025च्या आयपीएल हंगामात केकेआरच्या कर्णधारपदाची भूमिका साकारू शकतात.
1) एडन मारक्रम- एडन मारक्रमला (Aiden Markram) सनरायझर्स हैदराबादने आगामी हंगामापूर्वी रिलीज केले आहे. त्यामुळे केकेआरसाठी तो कर्णधारपदासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे एसए-20 मधील संघ सनरायझर्स इस्टर्न केपने त्याच्या नेतृत्वाखाली सलग 2 विजेतेपदं पटकावली आहेत.
2) रिषभ पंत- रिषभ पंत (Rishabh Pant) 2016 पासून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा महत्त्वाचा भाग होता, पण आता तो फ्रँचायझीपासून वेगळा झाला आहे. मेगा लिलावात पंतला खरेदी करण्यासाठी अनेक मोठे संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. यामध्ये केकेआरच्या देखील नावाचा समावेश आहे. अय्यर गेल्यानंतर कोलकाताला अशा खेळाडूची गरज आहे, जो दीर्घकाळ कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकेल. त्यामुळे पंत फ्रँचायझीसाठी चांगला पर्याय असू शकतो.
3) जोस बटलर- जोस बटलरचे (Jos Buttler) नाव राजस्थान रॉयल्सच्या (RR) कायम ठेवण्याच्या यादीत समाविष्ट नाही. बटलर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे, ज्याची आकडेवारी देखील चमकदार आहे. तो आता मेगा लिलावात विक्रीसाठी येणार आहे. यष्टीरक्षकाची भूमिका बजावण्यासोबतच तो कर्णधारपदाची जबाबदारीही चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचाही मोठा अनुभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे फलंदाज (टाॅप-5)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली-रोहित शर्मा यांची आकडेवरी कशी? पाहा सर्वकाही
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी मोहम्मद शमीचे पुनरागमन, या सामन्यातून करणार कमबॅक!