इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आठवडाभरापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाने नवीन कर्णधाराची नियुक्ती केली. केकेआरने नितीश राणाला नवीन कर्णदार म्हणून नेमले. त्याने दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर याची जागा घेतली आहे. अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. राणाने कर्णधारपद स्वीकारताच मोठे भाष्य केले आहे. त्याने सांगितले आहे की, त्याला धोनी, रोहित आणि विराटसारखे नेतृत्व करायचे नाहीये.
माध्यमांशी संवाद साधताना केकेआरचा नवीन कर्णधार नितीश राणा (KKR New Captain Nitish Rana) याला एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा होता की, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व केले आहे. मात्र, जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तू एमएस धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांपैकी कुणाला आदर्श मानतो. म्हणजेच, तू यापैकी कुणाला फॉलो करतो? या प्रश्नावर नितीशने उत्तर देत एकाचेही नाव घेतले नाही.
Official statement. @NitishRana_27 #AmiKKR #KKR #Nitish #NitishRana pic.twitter.com/SeGP5tBoql
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 27, 2023
नितीश राणा (Nitish Rana) म्हणाला की, “मी यापैकी कुणालाही फॉलो करत नाही आणि करायचेही नाही. मला माझ्या पद्धतीने खेळायचे आहे. मला माहिती आहे की, जर कुणालाही फॉलो केले, तर मी स्वत: मागे पडू शकतो. मी यावर्षी माझ्या पद्धतीने नेतृत्व करेल.”
First press conference as KKR Captain and Head-Coach: Say hi 👋 to skipper Nitish Rana and Chandrakant Pandit. 💜@NitishRana_27 #AmiKKR #TATAIPL2023 #NitishRana #Captain pic.twitter.com/U7aX0mAEq4
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 28, 2023
तीन हंगामात बनला चौथा कर्णधार
खरं तर, मागील 3 हंगामात नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा चौथा कर्णधार बनला. नितीशपूर्वी दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर आणि ऑयन मॉर्गन यांनी केकेआरचे नेतृत्व केले होते. नितीशला आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव नाहीये. त्याने आजपर्यंत कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व केले नाहीये. आता आगामी हंगामात तो नेतृत्वात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (kkr new captain nitish rana statement said i do not want to follow captaincy style of ms dhoni read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पिक्चर अभी बाकी है! एमएस धोनीच्या IPL निवृत्तीवर रोहितचे मोठे विधान, ‘माही’प्रेमींनी वाचाच
SA vs WI: तिसऱ्या टी20त फलंदाजांची कमाल, 40 ओव्हरमध्ये चोपल्या 433 धावा; मालिका विंडीजच्या नावे