---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या माजी मिस वर्ल्डची भविष्यवाणी ठरली खरी, केकेआरचा विजयासह झाला शुभारंभ

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 9:02 AM
---Advertisement---

कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने त्यांच्या आयपीएल २०२१ मधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाला १० धावांनी पराभूत केले आहे. हा सामना खेळायच्या आधीच कोलकत्ता संघ जिंकणार अशी भविष्यवाणी केली गेली होती. ती कोणी ज्योतिषाने नाही तर ऑस्ट्रेलियाची माजी मिस वर्ल्ड एरिड हॉलैंड हिने केली होती. ती २०१३ या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाकडून मिस वर्ल्ड स्पर्धेकरीता निवडली गेली होती.

ऑस्ट्रेलियाच्या माजी मिस वर्ल्डने सामन्यापूर्वीच केकेआर संघाच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. यानंतर प्रतिस्पर्धी हैदराबाद संघाचा खेळाडू राशिद खान आणि तिच्यात सोशल वॉर रंगल्याचेही पाहायला मिळाले होते.

Screemgrab: Instagram/Rashid Khan

मिस वर्ल्ड एरिड हॉलैंड कोलकत्ता संघातील बेन कटिंग या खेळाडूची पत्नी असल्यामुळे कोलकत्ता संघाला समर्थन देत आहे. ती फक्त संघासोबत जोडली गेलेली नाही तर तिला शाहरुख खानच्या संघाकडून तिच्या नावाची जर्सी पण तिला देण्यात आली आहे.

औस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग कोलकत्ता संघाचा सदस्य आहे. त्याचे एरिन हॉलैंड सोबत लग्न झाले आहे. मात्र हॉलैंडला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. एरिन हॉलैंड हिची ओळख फक्त बेन कटिंगची बायको म्हणून नाही, तर ती टीव्ही शोसुद्धा  होस्ट करत असते. ती काही खेळाच्या कार्यक्रमात पण दिसून आली आहे.

केकेआरच्या संघाने आयपीएल 2021 ची सुरुवात दणदणीत विजय मिळवून केली. यानंतर त्यांच्यापुढे आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान असणार आहे. मंगळवार रोजी (१३ एप्रिल) चेन्नई येथे त्यांचा हंगामातील दुसरा सामना होणार आहे. मुंबईने मागील सामन्यात पराभव मिळवल्यामुळे त्यांचा मानस हा सामना जिंकत दमदार पुनरागमन करण्याचा असेल. अशात केकेआर आपली विजयी लय काम करण्यात यशस्वी होतो का नाही हे पाहणे औतुस्क्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकर सूर्यकुमारच्या विस्फोटक फलंदाजीमागचं कारण काय? जाणून घ्या त्याचं ‘टॉप सिक्रेट’

SRH च्या गोटात झोंबले ‘वाथी कमिंग’चे वारे; पाहा वॉर्नर, भुवी अन् राशिदचा झक्कास डान्स

“माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत,” पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसन झाला भावूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---