---Advertisement---

SRH vs KKR : केकेआरने हैदराबाद संघाला जिंकण्यासाठी दिलं 201 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 हंगामातील पंधरावा सामना आज (03 एप्रिल) रोजी खेळला जात आहे. या सामन्यात मागील आयपीएलमधील गतविजेता म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि केकेआरला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. केकेआरने प्रथम फलंदाजी करून 200 धावा केल्या आहेत. तसेच हैदराबादला जिंकण्यासाठी 201 धावांचं आव्हान दिलं आहे.

केकेआरसाठी प्रथम फलंदाजी करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 29 चेंडूत 60 धावांची तुफानी पारी खेळली. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 38 धावा तर अंघकृष रघुवंशीने 32 चेंडू अर्धशतकी खेळ केली. क्विंटन डीकॉक आणि सुनील नरेन हे आज काही प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत.

तसेच हैदराबादसाठी मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. तसेच कर्णधार पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली. हर्षद पटेलने ही 2 विकेट घेतल्या.
या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 3-3 सामने खेळले आहेत, परंतु त्यांना फक्त एकच विजय मिळाला आहे. दरम्यान, हा सामना केकेआर आणि हैदराबाद दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना केकेआर ची सुरुवात खराब झाली होती त्यांनी 16 धावांवर दोन खेळाडू गमावले होते. त्यानंतर कर्णधार अजिंक्य व अंघकृष रघुवंशीने भागीदारी करत संघाला सावरले.
आता सनरायझर्स हैदराबाद किती षटकात हे आव्हान पूर्ण करेल हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---