आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (8 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना खेळला गेला. अखेरच्य चेंडूपर्यंत थरारक झालेल्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला. एक वेळ सामना हाताबाहेर गेला आहे असे वाटत असताना आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांनी वादळी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने सामना फिनिश केल्यानंतर संघाचा कर्णधार नितिश राणा व आंद्रे रसेल यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले.
https://twitter.com/IPL/status/1655647212591009793?t=03UYnPj_VgPlvNKWqlp5PQ&s=19
संघ अडचणीत सापडला असताना रिंकू सिंग याने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत संघाला विजयी रेषेपार नेले. अखेरच्य चेंडूवर एका धावेची गरज असताना त्याने चौकार खेचला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 10 चेंडूत 21 धावा केल्या. त्याच्या कामगिरीनंतर सामना संपल्यानंतर बोलताना संघाचा कर्णधार नितीश राणा म्हणाला,
“रिंकू सिंग याचा प्रवास पाहिल्यास आनंद होतो. अनेक वर्ष आपण या मैदानावर रसेल-रसेल असे ऐकले आहे. याच मैदानावर आता युवा रिंकूसाठी रिंकू-रिंकू असा आवाज येतो त्यावेळी अंगावर काटा उभा राहतो. त्याने यापूर्वी जे केले आहेत ते कदाचितच आता घडेल. मात्र, त्यानंतरही तो ज्याप्रकारे जबाबदारीने खेळत आहे हे चांगले वाटते.”
सामनावीर ठरलेल्या रसेल याने देखील त्याचे अशाच प्रकारे कौतुक केले. तो म्हणाला,
“रिंकू एक मेहनती मुलगा आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याचे सर्वांशी चांगले पटते. नितिश म्हणाला त्याप्रमाणे खरेच त्याच्या नावाचा जयघोष होत असताना अंगावर काटे उभे राहतात. त्याला या संघासाठी आणखी खूप काही करायचे आहे.तो ज्यावेळी इथे उभा असतो त्यावेळी मला देखील फिकीर राहत नाही.”
रिंकू सिंग याने गुजरात टायटन्सविरुद्ध अखेरच्या षटकात पाच षटकार मारत एक अविस्मरणीय विजय संघाला मिळवून दिलेला.
(KKR Skipper Nitish Rana And Andre Russell Praised Rinku Singh After His Knock)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक करावं तेवढं कमीच! KKRचा खेळाडू वेदनेने विव्हळत असताना धवनने केली मदत, व्हिडिओ जिंकेल मन
धवनचा भीमपराक्रम! फिफ्टी मारताच रचले 2 रेकॉर्ड, एका विक्रमात विराटशी बरोबरी; लगेच घ्या जाणून