यंदाच्या आयपीएल हंगामातील पंधरावा सामना आज (03 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात मागील आयपीएलमधील फायलिस्ट म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळला जात आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने टाॅस जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
हैदराबाद- अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीशकुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कमिंदू मेंडिस, हर्षल पटेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, सिमरजीत सिंग, झिशान अन्सारी
कोलकाता- क्विंटन डी काॅक, सुनिल नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसल, रमणदिप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 3-3 सामने खेळले आहेत, परंतु त्यांना फक्त एकच विजय मिळाला आहे. दरम्यान, हा सामना केकेआर आणि एसआरएच दोघांसाठीही खूप महत्त्वाचा असणार आहे. आयपीएल 2025 मध्ये केकेआरचा त्यांच्या घरच्या मैदानावर हा दुसरा सामना असेल, ज्यामध्ये त्यांनी यापूर्वी आरसीबीविरुद्ध येथे सामना खेळला होता. त्यात त्यांना 7 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे त्यांना विजयी ट्रॅकवर परतायचे आहे, दोन्ही संघांकडे सामना जिंकणारे खेळाडू आहेत. त्यामुळे सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.