कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी (१४ मे) आयपीएल २०२२चा ६१ वा सामना झाला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विजयासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान जिवंत राखण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात अखेर कोलकाताने ५४ धावांनी बाजी मारली. आंद्रे रसेल सामन्याचा सामनावीर राहिला.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ ८ विकेट्स गमावत १२३ धावाच करू शकला.
.@KKRiders are chipping away here in Pune! 👏 👏
Tim Southee scalps his second wicket as captain @ShreyasIyer15 completes the catch.
Follow the match 👉 https://t.co/BGgtxVmUNl#TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/p0wpoS5NWf
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
कोलकाताच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा केल्या. २८ चेंडू खेळताना २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ४३ धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऍडेन मार्करम चिवट झुंजीनंतर ३२ धावा करून बाद झाला. तसेच शशांक सिंगने ११ धावा जोडल्या.
या डावात कोलकाताकडून अष्टपैलू आंद्रे रसेलने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच टीम साउदीने २ आणि उमेश यादव, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
4⃣9⃣* Runs
2⃣8⃣ Balls
3⃣ Fours
4⃣ Sixes @Russell12A muscled his way to another solid show with the bat for @KKRiders with a fine knock. 👌 👌 #TATAIPL | #KKRvSRHRelive his innings 🎥 🔽https://t.co/dpUMBUJORd
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
तत्पूर्वी कोलकाताकडून प्रथम फलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा फटकावल्या. संघाने स्वस्तात मोठ्या विकेट्स गमावल्यानंतर रसेलने एकाकी झुंज दिली. २८ चेंडू खेळताना ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ४९ धावा फटकावल्या. त्याच्याखेरीज सॅम बिलिंग्जनेही ३४ धावा जोडल्या. तसेच अजिंक्य रहाणे (२८ धावा) आणि नितीश राणा (२६ धावा) यांच्या खेळींचेही योगदान राहिले.
या डावात हैदराबादच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. हैदराबादकडून उमरान मलिकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना ३३ धावा देत त्याने या विकेट्स काढल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन आणि टी नटराजन यांनीही प्रत्येकी १ विकेट चटकावली.
महत्त्वाच्या बातम्या-
शशांकने अडवला रहाणेचा सिक्स, बाउंड्री लाईनवर घेतला अनपेक्षित झेल; पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारा कॅच
‘टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली असती, पण…’, आरसीबीसाठी खेळलेल्या क्रिकेटरचे गाऱ्हाणे
Video: डीआरवरून उडाला गोंधळ, पंचांनी बाद दिल्यानंतरही मैदानावर अडून राहिला रिंकू सिंग