---Advertisement---

केकेआर जिंकणार नाही..! अश्विनने वर्तवला कोलकाता नाईट रायडर्सबद्दल मोठा अंदाज

On: शनिवार, मार्च 21, 2026 7:10 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी, देशाचे माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाबाबत मोठी भविष्यवाणी करून सर्वांना चकित केले आहे. ३९ वर्षीय माजी क्रिकेटपटूच्या मते, केकेआरच्या संघात आयपीएल २०२६ चे विजेतेपद मिळवण्याची क्षमता दिसत नाहीये. तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या केकेआर संघाने २०२४ मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर खेळाडूंसोबतच ‘बॅक रूम स्टाफ’मध्येही मोठे बदल केले आहेत.

​आगामी हंगामात केकेआरच्या शक्यतांबाबत बोलताना अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “कोरबो आहे, लोरबो आहे, पण मला वाटत नाही की ‘जीतबो’ (जिंकणे) शक्य आहे. केकेआरने तीनदा विजेतेपद पटकावले आहे – दोनदा गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आणि एकदा श्रेयस अय्यरच्या मार्गदर्शनाखाली. आता जेव्हा मी याबद्दल विचार करतो, तेव्हा श्रेयस अय्यरसोबत तुमच्याकडे पात्र (qualify) होण्याची संधी होती, पण ती संधी दुसऱ्या संघाने हिरावून घेतली. श्रेयस अय्यरचे नेतृत्व प्रेरणादायी राहिले आहे. केकेआरचे नुकसान हे पंजाब किंग्ससाठी (PBKS) फायदेशीर ठरले आहे.”

​अश्विन पुढे म्हणाला की, “लिलाव प्रक्रिया (Auction) संपल्यानंतर मी म्हणालो होतो की केकेआरची गोलंदाजी खूप मजबूत आहे, पण मुस्तफिजुर रहमान आता संघात नाहीये. पथिराना जखमी आहे आणि हर्षित राणा बाहेर गेला आहे. केकेआरला ब्लेसिंग मुजरबानीची साथ मिळाली आहे, ज्याबद्दल मला आनंद आहे कारण त्याने खूप मेहनत घेतली आहे. मी त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, इतके खेळाडू जखमी झाल्यानंतर कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. मला सध्या असा कोणताही खेळाडू दिसत नाही जो ही जबाबदारी पेलू शकेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---