मुंबई। रविवारी (१० एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) पार पडला. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी जिंकत हंगामातील दुसरा विजय नोंदवला. याच सामन्यादरम्यान कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणेमुळे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
रहाणेमुळे झाला हायव्होल्टेज ड्रामा
झाले असे की दिल्लीने कोलकाता समोर २१६ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करण्यासाठी कोलकाताकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजीसाठी आले. यावेळी पहिले षटक मुस्तफिजूर रेहमान करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर रहाणे चूकला आणि रिषभ पंतने चेंडू पकडला. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. त्यावर पंचांनी रहाणेला बाद दिले. पण रहाणेने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली.
पण रिव्ह्यूमध्ये दिसले की, चेंडू राहणेच्या बॅटच्या खूप जवळून गेला आहे. त्यामुळे अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला न लागल्याचे दिसले. पण, त्याचवेळी पंतने पायचीत आहे का, हे देखील पंचांना तपासायला सांगितले. पण, त्यातही रहाणे वाचला, कारण चेंडूचा इम्पॅक्ट ऑफ स्टम्पच्या बाहेर होता.
यानंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर पुन्हाएकदा मुस्तफिजूरने रहाणेला चकवले. मैदानावरील पंचांकडून रहाणेला यावेळी पायचीत देण्यात आले. पण, यावेळीही त्याने रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये दिसले की, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी त्याच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागला आहे. त्याचमुळे त्याला जीवनदान मिळाले.
https://twitter.com/rishobpuant/status/1513128723226144770
दोनवेळा जीवनदान मिळाल्यानंतरही तिसऱ्या चेंडूवर रहाणे शॉट खेळण्यात चूकला होता. पण नशीबाने त्याची साथ दिली. झाले असे की, मुस्तफिजूरने टाकलेला तिसरा चेंडू ड्राईव्ह खेळण्याच्या नादात रहाणे बाद झाला होता. त्याने यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल दिला होता. त्यावेळी त्याचा चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील बाजूस लागला होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, यावेळी दिल्लीच्या कोणत्याच खेळाडूने त्याच्या विकेटसाठी अपील केले नाही. त्यामुळे त्याला आणखी एक जीवनदान मिळाले.
विशेष म्हणजे यावेळी रहाणेनेही चेहऱ्यावर त्याच्या बॅटला चेंडू लागल्याचे भासू दिले नाही. तथापि, रहाणेला या जीवनदानाचा फार फायदा उचलता आला नाही. तो खलील अहमदविरुद्ध खेळताना ५ व्या षटकांत १४ चेंडूत ८ धावा करून बाद झाला.
https://twitter.com/rishobpuant/status/1513129187560751104
अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ
कोलकाताकडून २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच नितीश राणाने ३० धावांचे योगदान दिले. पण, अन्य कोणाला फार खास काही करता आले नाही. त्यामुळे कोलकाताचा डाव १९.४ षटकांत १७१ धावांवर संपुष्टात आला आणि दिल्लीने हा सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
रिटायर्ड आऊट म्हणजे काय रे भावा? आर अश्विनने आयपीएलमध्ये असेच बाद होत घडवलाय इतिहास
IPL2022| हैदराबाद वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| हैदराबादसमोर विजयीरथावर स्वार गुजरातचे आव्हान; केव्हा आणि कुठे होणार सामना, घ्या जाणून