मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 89 षटकात 2 बाद 215 धावा केल्या आहेत.
भारताकडून या सामन्यात मयंक अगरवालने पहिल्याच कसोटी सामन्यात खेळताना 161 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
त्याला या सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात केएल राहुलच्या ऐवजी स्थान देण्यात आले आहे. त्यानेही या संधीचे सोने करताना भारताला चांगली सुरुवात करुन दिली.
राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळताना 4 डावात फक्त 48 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला मेलबर्न कसोटीतील त्याचे स्थान गमवावे लागले आहे.
विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी 26 डिसेंबर 2014 मध्ये मेलबर्न कसोटीतूनच राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
भारताला मागील काही सामन्यांपासून सलामीवीरांचा प्रश्न सतावत होता. मुरली विजय आणि केएल राहुल मागील अनेक सामन्यांपासून धावा करण्यासाठी संघर्ष करत होते. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात मिळत नव्हती.
त्यामुळे या सामन्यात विजय आणि राहुलच्या ऐवजी हनुमा विहारी आणि अगरवालला सलामीला संधी देण्यात आली आहे. विहारी आणि अगरवालनेही चांगली सलामीला फलंदाजी करताना 18.5 षटकात 40 धावांची भागीदारी रचली.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत
–रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम
–८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली