भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी निर्णायक वळणावर आलेली दिसून येत आहे. भारतीय संघाला विजयासाठी केवळ 145 धावांचे आव्हान मिळाले असताना, बांगलादेशने भारताचे पहिले चार फलंदाज केवळ 45 धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय संघासमोर विजयी लक्ष पार करण्याचे आव्हान असेल. मात्र, या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला केएल राहुल हा पूर्णतः अपयशी ठरला.
ढाका कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ सामन्यात आघाडीवर होता. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशचा दुसरा डाव केवळ 231 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान राहिले. मात्र, भारतीय संघाची सुरुवातच खराब राहिली. कर्णधार केएल राहुल हा फक्त 2 धावांवर बाद झाला. त्यामुळे या मालिकेतील त्याची अपयशाची साखळी कायम राहिली.
राहुल हा चट्टोग्राम कसोटीतही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याने या कसोटीत दोन्ही डावात अनुक्रमे 22 व 23 धावा केल्या होत्या. तर ढाका कसोटीच्या पहिल्या डावातही तो फक्त आठ धावा करू शकलेला. यामुळे त्याने ही मालिका केवळ 57 धावांसह संपवली. त्याचवेळी त्याने अखेरच्या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतासाठी कसोटी सामने खेळले होते. त्यावेळी देखील तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. त्यावेळी त्याने 10,12 व 8 धावा केलेल्या.
राहुलच्या याच खराब कामगिरीमुळे आता त्याची संघातील जागा धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हा देखील सलामीवीर आहे. तसेच, शुबमन गिल हा देखील सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने राहुल याच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल.
(KL Rahul Again Flop In Bangladesh Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास
बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम