बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता या लग्नाची अंतिम तयारी सुरू झाली आहे. अगदी काही दिवसातच हे लग्न पार पडेल. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याची अथिया ही मुलगी आहे. सुनील शेट्टी आपल्या मुलीच्या लग्नात बॉलीवूडच्या बड्या स्टार्सना बोलावण्याची शक्यता वर्तवली जातेय.
राहुल व अथिया यांच्या लग्नासंदर्भातील मोठी बातमी नुकतीच आली. एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाचे ठिकाणही निश्चित झाल्याचे सांगितले गेले. अथिया आणि राहुल एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हेतर, सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हे लग्न होणार आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून हा निर्णय घेतला असून, लग्नाची तारीख राहुल निश्चित करेल. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने त्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा, हे लग्न पार पडेल. या लग्नाची जबाबदारी एका प्रसिद्ध वेडिंग प्लॅनर ऑर्गनायझरकडे दिले गेले आहे.
सुनील शेट्टीचे खंडाळ्यातील बंगल्याचे नाव ‘जहाँ’ आहे. 17 वर्षांपूर्वी सुनील शेट्टीने हा बंगला बांधला होता. हा बंगला सुनील शेट्टीच्या अगदी हृदयाच्या जवळ असल्याचे बोलले जाते. बंगल्याचा परिसर अत्यंत सुंदर असून, भरपूर हिरवळ आणि आतून अनेक वनस्पतींनी सजलेला आहे.
राहुल व आथिया मागील जवळपास तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षीच या दोघांनी आपले नाते सार्वजनिक केले होते. तसेच सुनील शेट्टी याने देखील या नात्यावर शिक्कामोर्तब केलेले. आथिया नेहमी राहुलला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकची धुलाई झाल्यावर माजी दिग्गजाला आठवला रविंद्र जडेजा, म्हणाला…
मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक टी-20 विश्वचषकात घालणार राडा! बेबी एबीची संधी हुकली
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार