क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटपटूंच्या मैदानावरील विक्रमांबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप रस असतो. क्रिकेटपटूचे कुटुंब, क्रिकेटव्यतिरिक्त त्याचा इतर व्यवसाय, त्याची आवड- निवड अशा बारीकसारीक गोष्टींवर चाहते लक्ष ठेवून असतात. त्यातही एखाद्या क्रिकेटपटूच्या अभिनेत्रीसोबतच्या अफेयरच्या चर्चा तर त्यांच्या डोळ्यांपासून लपून राहणे जवळपास अशक्यच असते.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्याबाबतही असेच घडले आहे. राहुल आणि बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणाऱ्या सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांचे नाते जगापासून लपून राहिलेले नाही. सोशल मीडियावर सतत या जोडीच्या अफेयरची चर्चा चालू असते. नुकत्याच एका पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
झाले असे की, बुधवारी (२३ डिसेंबर) अथियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आणि राहुलने लगेच त्यावर कमेंट केली. अथियाने सूर्यफुलांचा गुच्छ हातात घेऊन सोप्यावर बसलेला आपला सुंदर फोटो पोस्ट केला. या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिले की, ‘फुले मला आनंद देतात.’ अथियाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुलने गुलाबाच्या फुलाचा इमोजी पाठवला. त्यानंतर चाहत्यांनी या जोडीला चिडवण्याची संधी सोडली नाही.
https://www.instagram.com/p/CJIv6PzH830/?utm_source=ig_web_button_share_sheet
वाढदिवसा दिवशी झाली होती चर्चा
नोव्हेंबर महिन्यात अथियाचा २८वा वाढदिवस झाला. यादिवशी राहुलने अथियासाठी केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली. आपला अथियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत राहुलने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘हॅपी बर्थडे माय चाईल्ड.’ अथियानेही राहुलच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ‘हॅपी बर्थ डे माय पर्सन,’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.
https://www.instagram.com/p/B_HV4MshXqD/?utm_source=ig_web_button_share_sheet
केएल राहुलची कारकीर्द
केएल राहुलच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर आजवर त्याने एकूण ४४ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान सर्वोच्च ११० धावसंख्येसह त्याने १५४२ धावा केल्या आहेत. तसेच ३५ वनडे सामन्यात १३३२ धावा आणि ३६ कसोटी सामन्यात २००६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएल २०२२ मध्ये दोन नवे संघ होणार सामील, बीसीसीआयने दिली माहिती