इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारताला पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या टी-२० मालिकेसाठी गुरुवारी (१४ जुलै) संघ घोषित केला. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना या मालिकेत पुनरागमनाची संधी मिळू शकते.
गुरुवारी बीसीसीआयने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जो संघ घोषित केला, त्यामध्ये अनेक खेळाडू पुनरागमन करत आहेत. परंतु चाहते आतुर आहेत ते केएल राहुल (KL Rahul) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये खेळताना पाहण्यासाठी. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) या दोघांची आगामी टी-२० मालिकेसाठी संघात निवड केली आहे, परंतु त्यांच्या खेळण्याविषयी कसलीही खात्री मात्र दिली नाहीये. मालिका सुरू होण्यापूर्वी त्या दोघांची फिटनेस पाहून संघ व्यवस्थापन त्यांना खेळवण्याविषयी निर्णय घेऊ शकते.
राहुलने आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आणि संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवले. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ राहुलच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार होता. तसेच इंग्लंडच्या दौऱ्यातही त्याला संघात स्थान दिले होते, मात्र दुखपातीमुळे त्याला दोन्ही देशांविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.
कुलदीप यादवनेही आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला सहभागी केले गेले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतून आता या दोघांनाही भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळणार आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENGvsIND: लॉर्ड्सवर होणाऱ्या महत्वाच्या वनडे सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि हवामान, वाचा सविस्तर
IND vs WI: टीम इंडियात ‘या’ फिरकीपटूचे पुनरागमन, कारकीर्द वाचण्यासाठी करेल सर्वतोपरी प्रयत्न
ENGvsIND: इंग्लंडला हरवणे सोपे नाही, वनडेतील कामगिरी पाहुन तुम्हीही असेच म्हणाल