भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज केएल राहुलने त्याच्या दखापतीवर उपचार करण्यासाठी जर्मनी दौरा केला. त्याठिकाणी राहुलवर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आणि तो या दुखण्यातून सावरत आहे. शस्त्रक्रियेनंतर राहुल सध्या मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. त्याने इनडोअर अकादमीत फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. सुनील शेट्टीने या पोस्टवर केलली कमेंट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करणार होता, परंतु दुखातीमुळे त्याला या संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली. उपचार घेण्यासठी राहुल जर्मनीला गेला आणि त्याच्यासोबत त्याची प्रेयसी आथिया शेट्टी (Athiya Shetty) देखील आहे. राहुलने आथियासोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शस्त्रक्रियेनंतर राहुलने फलंदाजीचा सराव करतानाचा जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यावार चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. यामध्ये बॉलिवुड अभेनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) याचाही समावेश आहे. सुनीलने या पोस्टवर हर्टची इमोजी पोस्ट केली आहे. सुनीलने राहुलच्या पोस्टवर कमेट करताच चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CfrOUkrqPlk/?utm_source=ig_web_copy_link
राहुलने जर्मनीत स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया केली असून तो यातून स्वस्ताला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमवीर तो इनडोअर अकादमीत फलंदाजीचा सरावही करू लागला आहे. सराव सत्रातीय या व्हिडिओवर आतापर्यंत राहुलच्या ५ लाखापेक्षा अधिक चाहत्यांकडून लाईक्स आल्या आहेत. राहुल आणि अथिया शेट्टी मागच्या मोठ्या काळापासून एकमेकांसोबत आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चांही नेहमीच होत असतात. अशात सुनील शेट्टीने राहुलच्या पोस्टवर कमेंट केल्यानंतर त्याची चर्चा होणे सहाजिकच आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या टी-२० मालिकेतून राहुलने माघार घेतल्यानंतर रिषभ पंतने संघाचे नेतृत्व केले. दुखापतीमुळे राहुल इंग्लंड दौऱ्याद देखील सहभागी होऊ शकला नाहीये. इंग्लंड दौऱ्यात भारताने मागच्या वर्षी राहिलेला पाचवा कसोटी सामना खेळला आहे. आता इंग्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पूजा वस्त्राकरचा विश्वविक्रम, बनली ‘अशी’ कामगिरी करणारी जगातील पहिला महिला क्रिकेटपटू
पहिल्याच सामन्यात रोहितनं केली निराशा! तिसऱ्या षटकांत मोईने अलीने दिला भारताला मोठा झटका
रोहितच्या पुनरागमनानंतर भारताचे नशिब फळफळले! नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय