मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने या विजयासह आपल्या महत्वपूर्ण इंग्लंड दौऱ्याची विजयी सुरवात केली.
भारताने प्रथमच इंग्लंमध्ये इंग्लंडवर टी२०मध्ये विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय गोलंदाज कुलदीप यादव आणि फलंदाज केएल राहुल जाते.
या सामन्यात केएल राहुलने ५४ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्यात त्याच्या ५ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता.
केएल राहुलची ही आंतरराष्ट्रीय टी२०मधील दुसरी शतकी खेळी होती. यापुर्वी त्याने २०१६मध्ये विंडीजविरुद्ध त्याने टी२०मध्ये शतकी खेळी केली होती. तो सामना विंडीजने १ धावेने जिंकला होता.
याबरोबर भारताकडून टी२०मध्ये दोन शतके करणारा केएल राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी रोहित शर्माने भारताकडून दोन टी२० शतके केली आहेत.
भारताकडून आजपर्यंत रोहित शर्मा (२), केएल राहुल (२) आणि सुरेश रैना (१) यांनाच टी२०मध्ये शतके करता आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने…
-अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रचला विश्वविक्रम
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
-सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!