---Advertisement---

आथिया शेट्टीच्या स्विमसुटवरील फोटोवर केएल राहुलने केली अशी काही कमेंट, चाहतेही झाले अवाक्

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 5:32 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचे नाते सर्वांपासून लपून राहिलेले नाही. तो एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना खूप लवकर पकडले जातात. नुकताच अथियाने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. स्विमसुटवरील त्या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर अथियाचा हा स्विमसुटवरील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर प्रियकर केएल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे. पण, त्याने प्रतिक्रिया देता असे काही लिहिले की, सर्व चाहते विचारात पडले. राहुलने अथियाच्या फोटोवर कमेंट करत ‘Jefa’ असे लिहिले. त्यामुळे चाहते विचारात पडले आहेत की, ‘जेफा’ या शब्दाचा अर्थ काय होतो? KL Rahul Commented Strangely On His Girlfriend Athiya Shetty Swimwear Photo

https://www.instagram.com/p/CEEJK2QHhfW/

जेफा हा एक स्पॅनिश शब्द आहे. याचा अर्थ ‘बॉस म्हणजे मालक’ असा होतो. यावरुन लक्षात येते की, राहुलने अथियाच्या स्विमसुटवरील फोटोला बॉस अशी कमेंट केली आहे. काही चाहत्यांनी त्यांना या शब्दाचा अर्थ न समजल्यामुळे राहुलच्या या कमेंटवर प्रत्युत्तरही दिले आहेत.

Screengrab: Instagram/ AthiyaShetty

अथियाने राहुलच्या वाढदिवसादिवशीही एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने त्यांच्यातील अफेयरची पुष्टी केली होती.

केएल राहुल हा १९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. त्याच्यावर या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये पहिल्यांदा कोणत्या संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.

राहुल २०१३पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६७ सामने खेळत १९७७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोना आला आणि ‘या’ खेळाडूचे क्रिकेट करियरचं वाढलं, आता खेळणार २०२३ विश्वचषक

सानिया मिर्झाने विचारले, काय मी जाड झालीय का? उत्तर देताना शोएब मलिककडून झाली ‘ही’ मोठी चूक

पहिलंच कसोटी शतक मारल्यावर धोनी घेणार होता निवृत्ती, पहा काय होतं नक्की प्रकरण

ट्रेंडिंग लेख –

चार पावले चालत ड्रेसिंग रूमकडे पाहून एक कडक सॅल्यूट मारणारा शेल्डन कॉट्रेल

काय सांगता! वनडे सामन्यात फक्त दोन चेंडूत केले गेले होते आव्हान पूर्ण

या ५ कारणांमुळे एमएस धोनीने निवृत्ती न घेता अजून खेळणे अपेक्षित होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---