भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. उभय संघात या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (१८ ऑगस्ट) हरारे येथे खेळला गेला. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार केएल राहुल याने कोट्यवधी भारतीयांचे हृदय जिंकणारी कृती केली आहे. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात (India vs Zimbabwe) नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर भारत आणि झिम्बाब्वे दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी (National Anthem) मैदानावर जमले. यावेळी सर्व खेळाडूंसोबत ओळीत उभा राहिलेला राहुल च्यूइंगम खात होता. पण जसे मैदानावर भारताचे राष्ट्रगीत सुरू होणार आहे असा आवाज ऐकू आला, तसे राहुलने त्याच्या तोंडातील च्यूइंगम काढले. ते च्यूइंगम आपल्या हातात (Rahul Took Out Chewing Gum) पकडून तो राष्ट्रगीतावेळी शांतपणे उभा राहिला.
राहुल यावेळी तोंडात च्यूइंगम ठेवून तसेच राष्ट्रगीतासाठी उभा राहू शकला असता. परंतु याने राष्ट्रगीताचा अपमान झाला असता. त्यामुळे त्याने अशी कृती केली आहे. राहुलने भर मैदानात अशी कृती करत सामना पाहणाऱ्या लाखो-करोडो दर्शकांपुढे देशभक्तीचा आदर्श ठेवला आहे.
https://twitter.com/AryanMane45/status/1560163019421757441?s=20&t=XKZtNonB3V_o3mTmuV0pBQ
दरम्यान झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून भारतीय संघात दीपक चाहरचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिलेला चाहर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल. तसेच शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांना सलामीवीर म्हणून संघात घेतले गेले आहे. तर इशान किशन आणि कर्णधार राहुल अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले. दुसरीकडे राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड या नवख्या खेळाडूंना मात्र पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आले.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारतीय संघ- शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सामना पाहण्यास येणार का? केएल राहुलच्या प्रश्नावर युवा चाहता म्हणाला, ‘शाळा गेली…’
‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया






