मंगळवारी (17 जुलै) लिड्स येथील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडने 8 गडी राखून पराभव केला.
या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला.
या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला वगळून दिनेश कार्तिकला भारतीय संघात संधी देण्यात आली होती.
भारताच्या पराभवानंतर निराश झालेल्या चाहत्यांनी या निर्णयावर जोरदार टिका केली. यासाठी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींना जबाबदार ठरवत चांगलेच धारेवर धरले.
भारतीय चाहत्यांनी सामन्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्रींचा ट्विटरवरुन समाचार घेतला.
One failure and KL Rahul is dropped.. Unfortunate! He looks like India's best bat in all three formats after Virat Kohli. Must be a given a long rope… #ENGvIND
— Navneet Mundhra (@navneet_mundhra) July 17, 2018
https://twitter.com/BerbaSpin/status/1019176251913920518
#ENGvIND #CBHaveYourSay Indian team management is wasting a talent like Kl Rahul in ODIs just like they did with Rahane..Just hope his career doesn't go wayward like Jinx because of this musical chair game @_rrroy_
— Arsh (@SanelyInsane_) July 17, 2018
KL Rahul sitting out and Raina still in playing XI? Thoughts? I think Karthik should play but in place of Raina.
— A.K (@HaddHaiYaar) July 17, 2018
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण देखील कोहली-शास्त्रींच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाला होता. त्याने एक वृत्तपत्राशी बोलताना राहुलला वगळण्याच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या अणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या 71 धावा वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
भारताच्या 256 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 44.3 षटकात 2 गडी गमावून या सामन्यासह मालिका जिंकली. इंग्लडच्या या विजयात जो रुट नाबाद 100 आणि कर्णधार इयोन मॉर्गनने 88 धावांचे योगदान दिले.
या विजयाबरोबर इंग्लंडने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या-
-विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने
-तब्बल नऊ एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघावर आली ही वेळ