भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर आणि आयपीएलमध्ये 2021पर्यंत पंजाब संघाचे नेतृत्व संभाळलेल्या केएल राहुल (KL Rahul) याच्या शिरावर आता नवी जबाबदारी आली आहे. पंजाब संघाने रिटेन न केल्यानंतर (रिटेन करु दिले नाही) केएल राहुलसाठी नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नवी जागा खुली झाली आहेे. आयपीएल 2022मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ‘लखनौ संघाने’ केएल राहुलला रिटेन (खेळाडू कायम) केले आहे.
शुक्रवार (21 जानेवारी) ही लखनौ (lakhnau team ipl) आणि अहमदाबाद या संघांसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी अखेरची मुदत होती. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा दोन्ही संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे, त्यांना दिलेली रक्कम आणि त्यांचे संघातील स्थान याबाबत घोषणा केली. यात लखनौ संघाचे संघमालक गोयंका यांनी केएल राहुल हा लखनौ संघाकडून रिटेन केलेला क्रमांक एकचा खेळाडू असून त्यालाच यष्टीरक्षण आणि संघांचे नेतृत्वपद देत असल्याचेही सांगितले. (KL Rahul has been appointed as the captain of Lucknow IPL franchise)
KL Rahul will be leading Lucknow based IPL franchise.
— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2022
कुणाला किती रक्कम…
लखनौ संघाने जे तीन खेळाडू रिटेन केले त्यात केअल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. यात लखनौ संघाने राहुलला सर्वाधिक 17 कोटी रुपये देऊ केले आहेत. त्या खालोखाल स्टोईनिसला 9.2 कोटी तर रवी बिश्नोईला 4 कोटी रुपये देण्यात येत असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.
The draft players of Lucknow franchise:
KL Rahul (17 cr)
Marcus Stoinis (9.2 cr)
Ravi Bishnoi (4 cr)— Johns. (@CricCrazyJohns) January 21, 2022
केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी….
केएल राहुल हा लखनौ संघाकडून रिटेन होण्याअगोदर पंजाब किंग्ज संघाचा संघनायक होता. तसेच त्याने अनेक वर्षांपासून ही जबाबदारी पार पाडली होती. मात्र, 2022च्या रिटेन्शनमध्ये त्याने पंजाबकडून पुढे जाण्यास नकार दिला. त्यामुळेच लखनौ संघाला केएल राहुला रिटेन कऱणे सोपे झाले.
https://www.instagram.com/p/CUzeSkFFtYW/?utm_source=ig_web_copy_link
केएल राहुलने 2013मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. त्याचा पहिला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु होता. राहुल 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग बनला आणि 2016 मध्ये त्याचा बंगलोर सोबत करार झाला. 2018 च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 11 कोटी रुपयांना विकत घेतले.
2018 पासून राहुलची आयपीएलमधील कामगिरी दमदार झालेली आहे. मागील दोन पर्वात तो पंजाब किंग्सकडून खेळला. त्याने 55 सामन्यांत 56.62 च्या सरासरीनं 2548 धावा केल्या आहेत. त्यात 25 अर्धशतकं व दोन शतकांचा समावेश आहे. त्यानं 2018 ते 2021 या तीन पर्वात अनुक्रमे 659, 593 आणि 626 धावा केल्या आहेत.
अधिक वाचा –
- मारक्रमची विजयी धाव आणि कर्णधार राहुलवर बसला लाजीरवाण्या पराक्रमाचा शिक्का; आयुष्यभर नाही विसरणार
- भारताने सामना गमावला आणि मालिकाही! द. आफ्रिकेचा दुसर्या वनडेत ७ गड्यांनी शानदार विजय
- BREAKING: १७ कोटीत लखनऊकर झाला राहुल; स्टॉयनिस-बिश्नोई साथीला