सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमुळे क्रिकेटप्रेमींचे चांगले मनोरंजन होत आहे. अशातच मंगळवारी (25 एप्रिल) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आही. बीसीसीआयने घोषित केलेल्या संघात अजिंक्य रहाणे यालाही मोठ्या काळानंतर देशासाठी खेळण्याची संधी दिली गेली आहे. दुसरीकडे अनुभवी सलामीवीर केएल राहुल याला या संघात निवडल्यामुळे अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत.
केएल राहुल (KL Rahul) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. राहुलने भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये खेळला होता. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 17, तर दुसऱ्या डावात 1 धावा केली होती. त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध केले होते. या सामन्यात त्याने 123 धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर मागच्या मोठ्या काफासून राहुल धावा करण्यासाठी झगडतानाच दिसला आहे. दरम्यानच्या काळात 50 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
मागच्या 10 कसोटी इनिंगमधील राहुलचे प्रदर्शन
*12 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2022)
*10 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2022)
*22 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)
*23 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)
*10 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)
*2 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)
*20 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023)
*दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही
*17 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023)
*1 धाव विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023)
मागच्या 10 कसोटी इनिंग्जमध्ये राहुलने अवघ्या 117 धावांचे योगदान संघासाठी दिले आहे. यादरम्यान त्याची सरासरी 11.7 राहिली आहे आणि एकदाही 25 धावांचा आकडा गाठू शकला नाहीये. आयपीएल 2023 मध्ये राहुल धावा करत आहे, मात्र त्याचा स्ट्राईक रेट टीकाकारांसाठी भांडवल ठरत आहे. असात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी त्याला निवडणे ही निवडकर्त्यांचा निर्णय योग्य ठरणार की चुकीचा, याकडे सर्वांचे लक्ष असेल. (KL Rahul has been criticized for being selected for WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साडेसात कोटींचा वेगवान गोलंदाज आयपीएल हंगामातून माघार घेण्याच्या तयारीत, लखनऊ संघाची वाढली डोकेदुखी
डब्ल्यूटीसी फायनसाठी संघ घोषित होताच रवी शास्त्रींनी केलेले ट्वीट चर्चेत, पाहा काय लिहिले