29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान रणजी ट्रॉफी 2019-20 हंगामाची उपांत्य फेरी पार पडणार आहे. या फेरीत कर्नाटक संघाचा सामना बंगाल विरुद्ध इडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कर्नाटककडून केएल राहुल खेळताना दिसणार आहे.
राहुल नुकताच न्यूझीलंड दौऱ्यात भारताकडून वनडे आणि टी20 मालिकेत खेळला. पण त्यानंतर सुरु झालेल्या कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश नसल्याने तो भारतात परतला आहे. त्यानंतर त्याने काही दिवस विश्रांती घेणे पसंत केल्याने तो 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळला नव्हता.
पण आता तो रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध आहे. राहुल सध्या चांगल्या लयीत असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत 56 च्या सरासरीने सर्वाधिक 224 धावा केल्या होत्या. तसेच 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने 204 धावा केल्या होत्या.
राहुल बरोबरच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात कर्नाटकच्या संघात मनिष पांडेचाही समावेश आहे. पांडेही न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाकडून खेळला असून त्याचाही कसोटी संघात समावेश नसल्याने तो भारतात परतला आहे.
भारतात परतल्यानंतर पांडे विश्रांती घेण्याऐवजी जम्मू आणि काश्मिर विरुद्ध कर्नाटककडून उपांत्यपूर्व फेरीत खेळला. या सामन्यात त्याने दोन्ही डावात अनुक्रमे 37 आणि 35 धावा केल्या.
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी असा असेल कर्नाटकचा संघ –
करुण नायर (कर्णधार), आर. समर्थ, देवदत्त पडिक्कल, मनीष पांडे, केएल राहुल, शरथ श्रीनिवास, श्रेयस गोपाळ, कृष्णप्पा गॉथम, अभिमन्यू मिथुन, के.व्ही. सिद्धार्थ, प्रसिध्द कृष्णा, जे. सुचित, प्रतीक जैन, रोनित मोरे, आणि बी.आर. शरथ.
आशिया इलेव्हन संघात विराट कोहली, केएल राहुलसह ६ भारतीयांचा समावेश; असे आहेत संघ
वाचा????https://t.co/hDbY16lqVh????#म #मराठी #Cricket #AsiaX1vWorldX1 @imVkohli @klrahul11— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020
मास्टर ब्लास्टर सचिनचे चूकीचे नाव घेतल्याने आयसीसीनेही केले ट्रम्प यांना ट्रोल
वाचा????https://t.co/BlJaHrynzJ????#म #मराठी #Cricket #DonalTrump #SachinTendulkar— Maha Sports (@Maha_Sports) February 25, 2020