कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६६वा सामना खेळला गेला. लखनऊकडे हा सामना जिंकत प्लेऑफसाठी पात्रता मिळवण्याची संधी होती. त्याच पार्श्वभूमीवर लखनऊ संघाने जबरदस्त खेळ दाखवला. या सामन्यादरम्यान लखनऊ संघाचा कर्णधार व सलामीवीर केएल राहुल याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
नाणेफेक जिंकून लखनऊचा कर्णधार राहुलने (KL Rahul) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्वत: राहुल आणि क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) लखनऊकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आले होते. दोघांनी अप्रतिम फलंदाजी करत १३ षटकांमध्ये पहिल्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी रचली. यादरम्यान दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले.
दरम्यान राहुलने चालू हंगामातील त्याच्या वैयक्तिक ५०० धावाही (KL Rahul 500 Runs) पूर्ण केल्या. राहुलने सलग पाचव्या आयपीएल हंगामात ५०० धावांचा आकडा गाठला आहे. आयपीएल इतिहासात सलग पाच हंगामांमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा राहुल पहिलाच भारतीय फलंदाज (500 Runs In Consecutive 5 IPL Seasons) ठरला आहे. राहुलपूर्वी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला ही विक्रमी कामगिरी करता (Only Indian Player) आलेली नाही.
500 runs in IPL for @klrahul for the fifth straight season. Becomes the first Indian player to achieve this feat.#TATAIPL pic.twitter.com/Pt9XaJFdBt
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
राहुलने गतवर्षी (२०२१) आयपीएलमध्ये १३ सामने खेळताना ६२.६० च्या सरासरीने ६२६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ अर्धशतके निघाली होती. तत्पूर्वी अर्थात आयपीएल २०२०मध्ये १४ सामने खेळताना त्याने ६७० धावांचा आकडा गाठला होता. या धावा त्याने ५५.८३च्या सरासरीने केल्या होत्या व यादरम्यान त्याने १ शतक व ५ अर्धशतकेही केली होती. तर आयपीएल २०१९ मध्ये १४ सामन्यात ५३.९० च्या सरासरीने ५९३ धावा व २०१८ मध्ये १४ सामन्यांमध्ये ५४.९१ च्या सरासरीने ६५९ धावा फटकावल्या होत्या.
FIFTY for @klrahul 👏👏
His 30th in #TATAIPL
Live – https://t.co/NbhFO17wA7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/jyxac2TjMv
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
याखेरीज राहुलचे कोलकाताविरुद्धचे हे अर्धशतक हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३०वे अर्धशतक आहे. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा सहावा भारतीयही बनला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्लास क्लास क्लास…! क्विंटन डी कॉकचे केकेआरविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक
रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक
आगामी टी२० मालिकांसाठी वीवीएस लक्ष्मण बनणार टीम इंडियाचा महागुरू, मग द्रविडचं काय? वाचा