मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने या विजयासह आपल्या महत्वपूर्ण इंग्लंड दौऱ्याची विजयी सुरवात केली.
भारताने प्रथमच इंग्लंमध्ये इंग्लंडवर टी२०मध्ये विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय गोलंदाज कुलदीप यादव आणि फलंदाज केएल राहुल जाते.
या सामन्यात केएल राहुलने ५४ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्यात त्याच्या ५ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता.
तर कुलदीप यादवने ४ षटकांत केवळ २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या ५ विकेट्समध्ये बटलर, हेल्स, मार्गन, रुट आणि ब्रेअस्ट्रोचा समावेश होता.
हे इंग्लंडचे प्रमुख फलंदाज असून यातील कोणत्याही दोघांनी चांगली कामगिरी केली तरी इंग्लंड सहज २००चा टप्पा पार करते. अशा फलंदाजांना कुलदीपने खेळून दिले नाही. त्यामुळे या सामन्यात त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
राहुलच्या नावावर वेगळाच विक्रम-
यामुळे केएल राहुलच्या नावावर मात्र एक वेगळाच विक्रम झाला आहे. टी२० मध्ये जिंकणाऱ्या संघाकडून शतकी खेळी करुनही सामनावीर पुरस्कार न मिळालेला तो पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे २०१६मध्ये विंडीजविरुद्ध त्याने टी२०मध्ये शतकी खेळी केली होती. परंतु त्या सामन्यातही त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला नव्हता. परंतु तेव्हा तो सामना विंडीजने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
-सौरव गांगुलीपाठोपाठ आता गंभीरही करणार या क्रिकेट बोर्डात बाॅसगिरी!