भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज केएल राहुल हा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. आयपीएल हंगामात लखनऊ संघाचे नेतृत्व करत असलेल्या राहुलला आरसीबी विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो थेट अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. त्यानंतर त्याने उर्वरित आयपीएलमधून माघार घेतलेली. त्याने आपल्या मांडीची शस्त्रक्रिया केल्यानंतर तो काही महिन्यांसाठी मैदानाच्या बाहेर झाला. आता तो पुन्हा एकदा भारतीय संघात दिसण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो.
राहुल मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत होता. आयपीएलमध्ये देखील त्याचा हाच खरा फॉर्म कायम राहिला. अशात झालेल्या दुखापतीमुळे त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यानंतर आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर देखील तो संघाचा भाग नसेल. आता, तो आगामी आशिया चषकापर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही असे सांगण्यात येत आहे.
एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणखी दोन ते तीन महिने खेळण्याची शक्यता कमी आहे. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसून, त्यामुळे तो आशिया चषकात दिसणार नाही. संघ व्यवस्थापन देखील त्याला तंदुरुस्तीसाठी पूर्ण वेळ देऊ इच्छित आहे.”
राहुल हा भारताच्या टी20 संघातून मागील काही काळापासून बाहेर आहे. वनडे संघात देखील तो सलामीच्या स्थानी खेळत नसून, आता मधल्या फळी खेळताना दिसतो. आगामी वनडे विश्वचषकात तो पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. मात्र, त्याला या क्रमांकावर खेळण्यासाठी संजू सॅमसन व सूर्यकुमार यादव यांच्याशी स्पर्धा करावी लागू शकते.
(KL Rahul Likely Missed Asia Cup Due To Thigh Injury)
महत्वाच्या बातम्या –
वसीम जाफरच्या प्रश्नांमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना फुटेल घाम! संघ निवडीवर माजी सलामीवीर नाखुश
यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा