आयपीएल 2020 साठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा वरच्या फळीतील फलंदाज केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. याबद्दल पंजाब संघाने गुरुवारी माहिती दिली.
पंजाबचे मागील दोनवर्षे आर अश्विनने नेतृत्व केले होते. मात्र आयपीएल 2020 च्या मोसमासाठी त्याचे ट्रेडिंग दिल्ली कॅपिटल्सबरोबर करण्यात आल्याने तो आता दिल्लीकडून खेळेल. त्यामुळे पंजाबने आता आयपीएलच्या 13 व्या मोसमासाठी राहुलची कर्णधार म्हणून निवड केली आहे.
राहुल 2018च्या आयपीएल मोसमापासून पंजाबकडून खेळत आहे. त्याला पंजाबने 2018च्या आयपीएल लिलावात 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याने पंजाबकडून खेळलेल्या दोन्ही मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्याने मागील 2018 आणि 2019 या वर्षात अनुक्रमे 659 आणि 593 धावा केल्या आहेत.
त्याने आयपीएलच्या कारकीर्दीत एकूण 67 सामन्यात 138.15 च्या सरासरीने 1977 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल राहुल म्हणाला, “माझ्यावर किंग्स इलेव्हन पंजाबने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल आभार मानू इच्छितो. लिलाव चांगला पार पडला, त्यामुळे मी आयपीएलचा मोसम सुरु होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.”
असा आहे 2020 साठी किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ –
केएल राहुल(कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान, निकोलस पूरन, मनदीप सिंग, के गॉथम, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंग, हार्दस विल्जोइन, एम अश्विन, जे सुचित, हरप्रीत ब्रार आणि दर्शन नळकंडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हुडा, जेम्स निशाम, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तजिंदर धिल्लन.
लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…
वाचा👉https://t.co/EqoKENKJrf👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
या ३ भारतीय खेळाडूंवर लागली आयपीएल २०२० लिलावात सर्वाधिक रकमेची बोली https://t.co/d0ua3PVHhi#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020
— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019