---Advertisement---

मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,”तरीही तूला माझा सामना करावाच लागेल”

On: शुक्रवार, डिसेंबर 20, 2019 2:27 PM
---Advertisement---

गुरुवारी(19 डिसेंबर) कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावातून चार वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस लिनवर सुरुवातीलाच बोली लावली.

त्यांनी त्याला 2 कोटी या त्याच्या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे आता लिन 2020 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.

मुंबई संघात समावेश झाल्यानंतर लिनने एक खास ट्विट केला होता. ज्यात त्याने लिहिले होते की आता त्याला मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागणार नाही.

लिनने ट्विट केले की ‘मुंबई इंडियन्स, मस्त शहर, गुणवत्ता असलेली फ्रँचायझी, सपाट खेळपट्टी आणि बुमराहचा सामनाही करावा लागणार नाही. आयपीएल 2020 साठी उत्सुक आहे.’

https://twitter.com/lynny50/status/1207640354997948421

लिनच्या या ट्विटवर बुमराहनेही मजेशीर उत्तर देत त्याचे मुंबई इंडियन्स संघात स्वागत केले आहे. बुमराहने म्हटले आहे की ‘लिन तूझे संघात स्वागत आहे. पण तूला नेटमध्ये तरी माझा सामना करावाच लागले.’

https://twitter.com/Jaspritbumrah93/status/1207658124850552835

बुमराह 2013 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. तसेच त्याने मुंबई इंडियन्सला चार वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 77 सामने खेळले असून यामध्ये त्याने 26.59 च्या सरासरीने 82 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच लिनने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 41 सामने खेळले असून यात त्याने 33.68 च्या सरासरीने 1280 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1207941898289025024

https://twitter.com/Maha_Sports/status/1207932912357666816

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---