टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये १७ नोव्हेंबरपासून टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दरम्यान, जयपूरचे प्रदूषण मागच्या एक महिन्यापासून वाढलेले आहे. १२ नोव्हेंबरला तेथील वायू गुणवत्ता निर्देशांक खूप खराब होता. तर १५ नोव्हेंबरला संपूर्ण शहरात धुके आणि धुराचे साम्राज्य होते. अशात याठिकाणी भारत आणि न्यूझीलंड सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी केएल राहुलने वायू प्रदुषणाविषयी त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
चाहत्यांना जयपूरमधील वातावरण पाहून श्रीलंका संघाच्या दौऱ्याची आठवण होत आहे. या दौऱ्यात विरोधी संघाच्या खेळाडूंनी आरोग्य बिगडल्याची तक्रार केली होती. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ जयपूरणध्ये दाखल झाला आहे. या सामन्यात संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या केएल राहुलला स्टेडियमवरील सध्याच्या वातावरणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताणा त्याने एक खास प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल म्हणाल की, “खरेतर आम्ही अजूनपर्यंत बाहेर पडलो नाहीय. आम्ही आत्ताच स्टेडियममध्ये पोहोचलो आहोत, त्यामुळे माझ्याकडे याचे उत्तर नाहीय. मी माझ्या हातात मीटर घेऊन आलो नाही, त्यामुळे मला नाही महीत की, प्रदुषणाचा स्तर किती खराब आहे. मला विश्वास आहे की, हा एवढा खराब नाहीय. आम्ही सगळेच याठिकाणी क्रिकेट खेळायला आलो आहोत.”
दरम्यान, जयपूरमध्ये तब्बल ८ वर्षांनंतर अशाप्रकारचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले गेले आहे. मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बुधवारी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात अधिक धुके पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला फायदा मिळणार आहे. यूएईत नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकातही मैदानावर पडणाऱ्या दवांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यावेळी संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याला प्राथमिकता दिली होती.
न्यूजीलंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना, १७ नोव्हेंबर (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
दुसरा टी-२० सामना, १९ नोव्हेंबर (जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची)
तिसरा टी-२० सामना, २१ नोव्हेंबर (ईडन गार्डंन, कोलकाता)
पहिला कसोटी सामना, २५ ते २९ नोव्हेंबर (ग्रीन पार्क, कानपूर)
दुसरा कसोटी सामना, ३ ते ७ डिसेंबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहित कुशल रणनीतिकार, तर प्रशिक्षक द्रविडमुळे बनेल चांगले सांघिक वातावरण- केएल राहुल
असे ३ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी एकही शतक न ठोकता वनडे क्रिकेटमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा