हार्दिक पंड्याच्या आयुष्यात सध्या मुलाचे आगमन झाल्यापासून खूप आनंद आहे. त्याची पार्टनर नताशा स्टॅनकोव्हिच हीने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. यामुळे हार्दिकच नव्हे तर संपूर्ण कुटुंब मुलाच्या आगमनाने खूप आनंदित आहे. क्रिकेटपटू कुटुंबात जन्मलेला हा मुलगा भविष्यात क्रिकेटपटू व्हावा अशी चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर, हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की हार्दिकच्या नवजात मुलाशी तो क्रिकेटबद्दल बोलत आहे.
या व्हिडिओला पाहिल्यानंतर चाहत्यांनी कृणालला वेगवेगळे पर्याय सांगितले. काहींनी म्हटले की, हार्दिकच्या मुलाला अष्टपैलू बनवा. तर काहींनी म्हटले की, त्याला वेगवान गोलंदाज बनवा. दरम्यान हार्दिकच्या जवळचा मित्र आणि भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलने हार्दिकच्या मुलाच्या भविष्याबाबत त्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुलने कृणालच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “कृपा करुन याला वेगवान गोलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू बनायला सांगा.”
हार्दिक स्वत:देखील वेगवान गोलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. थोडक्यात, राहुलने हार्दिकच्या मुलाला हार्दिकसारखे बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. KL Rahul Reveals His Wish For Hardik Pandya Son
राहुल आणि हार्दिक हे एकमेकांचे खूप जिवलग मित्र आहेत. ते नेहमी एकमेकांच्या कठीण परिस्थितीत एकमेकांसोबत असतात. पण, राहुल गतवर्षी हार्दिक पंड्यामुळे एका मोठ्या विवादात अडकला होता. झाले असे की, हार्दिक आणि राहुल ‘कॉफी विथ करण शो’मध्ये गेले होते. या शोमध्ये हार्दिकने मुलींविषयी वादग्रस्त कमेंट केली होती, त्यामुळे बीसीसीआयने काही दिवसांसाठी दोघांवरही बंदी घातली होती. त्यांनी दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मधूनच भारतात परत बोलावून घेतले होते.
बीसीसीआयने म्हटले होते की, हार्दिकच्या कमेंटमुळे भारतीय क्रिकेटची छबी खराब झाली. पण, नंतर हार्दिक आणि राहुलने सोशल मीडिया अकाउंटवरुन बीसीसीआयची क्षमा मागितली होती. त्यामुळे नंतर सर्वकाही ठीक झाले. अशा विवादात्मक परिस्थितीमध्येही राहुल आणि हार्दिकच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित
‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित
ट्रेंडिंग लेख –
असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर