भारताचा कसोटीमधील सलामीवीर केएल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमधून बाहेर गेला आहे. २६ जुलै पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात शिखर धवन आणि अभिनव मुकुंद भारताची सलामीची जोडी असू शकते.
केएल राहुलच्या संघाबाहेर जाण्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावर आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेल्या राहुलला तापामुळे पहिल्या कसोटीला मुकावे लागणार आहे.
राहुल मार्च महिन्यापासून कोणत्याही प्रकारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्येही सहभागी झाला नव्हता. त्याच्या आधीच्या मुख्य दुखापतीने कारण हे खांद्याची दुखापत हे आहे.