भारत आणि न्यूझीलंड संघात १७ नोव्हेंबरपासून टी२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघात अनेक नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, तर संघात काही खेळाडूंना नवीन जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत. या टी२० मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल, तर केएल राहुल उपकर्णधार असेल. दरम्यान, मालिकेपूर्वी केएल राहुलने रोहितच्या नेतृत्त्वाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवीन टी२० कर्णधार रोहित शर्माबद्दल केएल राहुल म्हणाला, ‘आम्ही त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे आणि त्याचे आकडे सर्वकाही सांगतात. त्याला खेळाची उत्तम समज आहे आणि तो एक कुशल रणनीतीकार आहे. त्यामुळेच तो कर्णधार म्हणून इतकं यश मिळवू शकला.’
केएल राहुल पुढे म्हणाला, ‘तो ड्रेसिंग रूममध्ये स्थिरता आणेल. पुढील काही आठवड्यांत संघासाठी त्याचे काय लक्ष्य आहेत, हे जाणून घेणे रोमांचक असेल. सांघिक खेळांमधील निर्णय एकत्रितपणे घेतले जातात आणि कर्णधाराचे काम हे की सर्वांचे कार्य हे सुनिश्चित करणे, प्रत्येकाला त्याच्या भूमिकेची जाणीव करून देणे, तेव्हा खेळाडूंना संघात सुरक्षित वाटते.’
पत्रकारांशी बोलताना केएल राहुलने नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडवरही भाष्य केले. तो म्हणाला, ‘मी खूप भाग्यवान आहे की, मला राहुल द्रविड यांचा बराच सहवास लाभला, मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो. अगदी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, मी त्यांच्या सल्ल्याचे पालन करून खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि माझ्या फलंदाजीत बदल घडवून आणले. कर्नाटकात त्यांनी आम्हा सर्वांना खूप मदत केली आहे.’
केएल राहुल पुढे म्हणाला, ‘प्रशिक्षक या नात्याने ते सर्व युवा खेळाडूंसोबत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी येणे ही त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी आहे. त्यांचे नाव खूप मोठे आहे आणि त्यांनी देशासाठी काय केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे.’
💬 💬 It's a great opportunity to learn from him. #TeamIndia vice-captain @klrahul11 on working with the newly-appointed Head Coach Rahul Dravid. 👍#INDvNZ pic.twitter.com/Aqzp0YCXRE
— BCCI (@BCCI) November 15, 2021
भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी२० सामना १७ नोव्हेंबरला जयपूर येथे होणार असून दोन्ही संघ या ठिकाणी पोहचले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जिथे तिथे आम्हीच! ऑस्ट्रेलियाला टी२० विश्वचषकाचा विजेता बनवण्यात ‘या’ २ भारतीयांचे बहुमूल्य सहकार्य
‘टी२० विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघाविरुद्धची मालिका न्यूझीलंडसाठी सोपी नसेल’
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाजच ठरतोय संघांसाठी बॅडलक! जाणून घ्या, कसं ते?