दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा (Virat Kohli Resigns) दिला आहे. यानंतर आता भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते नव्या कर्णधाराच्या (New Test Captain) शोधात आहेत. कसोटी संघनायकाच्या शर्यतीत विद्यमान उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासह केएल राहुल (KL Rahul) हादेखील आघाडीवर आहे.
याच राहुलने कसोटी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचे तोंडभरून कौतुक केले (KL Rahul Praises Virat Kohli) आहे आणि त्याच्यात खेळाडूंकडून चांगले प्रदर्शन करवून घेण्याची क्षमता (Virat Kohli’s Leading Ability) असल्याचे त्याने म्हटले आहे. पहिल्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
जे विराटकडून शिकलो, तेच करू इच्छितो
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला की, विराटच्या नेतृत्त्वाखाली आम्ही नेहमीच शानदार प्रदर्शन केले आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली आम्ही परदेशात मालिका जिंकल्या, जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्याने उच्च मापदंड स्थापित केले आहेत. आम्ही फक्त संघात सुधारणा करू इच्छितोय. प्रत्येक सामना, प्रत्येक मालिका चांगल्या प्रदर्शनासाठी वेगळी संधी घेऊन येते. नेतृत्त्वाविषयी बोलायचे झाले तर, विराटमध्ये सर्व खेळाडूंकडून चांगले प्रदर्शन करून घेण्याची क्षमता आहे. मी हेच विराटकडून शिकलो आणि मला पुढे हेच करायचे आहे.
विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला होता. इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघाने २-१ ने आघाडी घेतली होती, परंतु अंतिम सामना कोविड-१९ मुळे होऊ न शकल्याने अद्याप या मालिकेचा निकाल लागलेला नाही.
अनुभवी शिखर धवनविषयी राहुल म्हणाला…
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन मागील विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता. तरीही त्याची दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. धवनविषयी बोलताना कर्णधार राहुल म्हणाला की, धवन संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की, त्याच्याकडून संघाला काय अपेक्षा आहेत. तो नेहमी मजा-मस्तीच्या मूडमध्ये असतो. कर्णधार म्हणून मी त्याला संधी उपलब्ध करून देईल. मी त्याला चांगले प्रदर्शन करायला प्रेरित करेल. मला वैयक्तिकरित्या धवनची फलंदाजी खूप आवडते.
महत्त्वाच्या बातम्या-
गावसकरांचा रोहितला कसोटी कर्णधार करण्याला नकार; ‘ही’ गोष्ट ठरलीये नकाराला मोठे कारण
जोहान्सबर्गमधील पराभवानंतरही केएल राहुल करू इच्छितोय कसोटी संघाचे नेतृत्व; म्हणे, मी संघाला पुढे…
पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत पार्टी करत होता जो रूट, तितक्याच आले पोलिस अन्…, बघा व्हिडिओ
हेही पाहा-