इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल )२०२१ च्या उत्तरार्धातील तिसरा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघातील चार खेळाडूंनी पदार्पण केले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावांचे आव्हान पंजाबसमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांनी संघाला शतकी सलामी दिली. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने यादरम्यान शानदार ४९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
राहुलची कॅप्टन्स इनिंग
राजस्थानने ठेवलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना पंजाबसाठी कर्णधार केएल राहुल व मयंक अगरवाल यांनी सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. मयंक अगरवाल फटकेबाजी करत असताना राहुल काहीसा शांत होता. मात्र, त्यानंतर त्यानेही संधी मिळताच काही आक्रमक फटके लगावले. राहुलला या खेळीदरम्यान तब्बल तीन जीवदानी मिळाली. राहुलने बाद होण्यापूर्वी ३३ चेंडूमध्ये ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४९ धावा बनवल्या.
राहुलने पूर्ण केल्या ३००० आयपीएल धावा
राहुलने आपल्या ४९ धावांच्या खेळी दरम्यान आयपीएल कारकिर्दीतील ३००० धावा पूर्ण केल्या. यासोबतच तो सर्वात जलद ३००० आयपीएल धावा बनवणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. राहुलने अवघ्या ८० डावांमध्ये ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ३००० धावा बनवण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. गेलने केवळ ७५ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणार्या मध्ये तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने ९४ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना आहे. त्याने ३००० आयपीएल धावा बनवण्यासाठी १०३ डाव खेळलेले. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असलेल्या एबी डिव्हिलियर्स व अजिंक्य रहाणे यांनी ३००० धावांसाठी प्रत्येकी १०४ डाव खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
https://mahasports.in/pbks-vs-rr-live-punjab-kings-13-overs-2-out-126-runs/
“पूर्वी फक्त भारत रडारवर होता, आता आणखी दोन संघ असतील”, पीसीबीच्या अध्यक्षांची धमकी