इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय फलंदाजांकडून अप्रतिम कामगिरी सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी (१२ ऑगस्ट) भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुलने तुफानी शतक झळकावत चाहत्यांचे मनोरंजन केले. यासह त्याने चाहत्यांचे मन जिंकणारे कृत्य देखील केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून भारतीय संघाला अप्रतिम सुरुवात करून दिली होती.दोघांनी मिळून पहिल्या गडीसाठी १२६ धावांची भागीदारी केली होती.
तर झाले असे की,भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना, १९ वे षटक सुरू होते. त्यावेळी पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही ड्रेसिंग रूममध्ये जाण्यासाठी धावत होते. त्यावेळी केएल राहुल हा सीमारेषेजवळ जाऊन थांबला आणि आपल्यापेक्षा अनुभवी असलेल्या रोहित शर्माला पुढे जाण्याचा मान दिला. परंतु, केएल राहूलला असे करताना पाहून रोहितने त्याला धक्का दिला आणि दोघेही सोबत ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.(Kl rahul stops to let rohit sharma go,watch video)
https://twitter.com/j_dhillon7/status/1425819425287016455?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1425819425287016455%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fengland-vs-india-kl-rahul-stops-to-let-rohit-sharma-go-first-watch-video-81369
पहिल्या दिवस अखेर भारतीय संघाची स्थिती मजबूत
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून १२३ धावांची भागीदारी केली होती. यामध्ये सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ८३ धावांचे योगदान दिले होते. तर चेतेश्वर पुजारा या डावात देखील पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. तो अवघ्या ९ धावा करत माघारी परतला.
तसेच कर्णधार विराट कोहलीने केएल राहुल सोबत मिळून चांगली फलंदाजी केली परंतु, तो देखील अर्धशतक झळकावण्याच्या वाटेवर असताना ४३ धावा करून माघारी परतला. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाच्या एकूण धावा ३ बाद २७६ आहेत. तर केएल राहुल नाबाद १२७ आणि अजिंक्य रहाणे १ धाव करून मैदानावर टिकून आहेत.
महत्वाच्या बातम्या –
केरळ सरकारने पीआर श्रीजेशसाठी केली बक्षीसाची घोषणा; इतके कोटी मिळण्याबरोबरच नोकरीतही बढती
हंड्रेड लीगमध्ये फलंदाजाची २५३ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी, बनल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
लॉर्ड्स मैदानावरील भारतीय फलंदाजांच्या सर्वोत्तम खेळी, ‘दादा’च्या पदार्पणातील शतकाचाही आहे समावेश