श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी विजयानंतर भारतीय संघ ३ ऑगस्टपासून कोलंबो येथे सुरु होणाऱ्या कसोटी संघात केएल राहुलची जागा पक्की आहे. हा खेळाडू मार्च महिन्यानंतर प्रथमच कसोटी खेळणार आहे.
केएल राहुल धरमशाला येथे शेवटची कसोटी सामना खेळला असून त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाहेर आहे. त्याने धरमशाला कसोटीमध्ये दोनही डावात अर्धशतकी खेळी केली होती.
आता खरा प्रश्न आहे तो अभिनव मुकुंद किंवा शिखर धवन यांपैकी कोणत्या खेळाडूला संघात केएल राहुलचा जोडीदार म्हणून संधी मिळणार? शिखर धवनने पहिल्या कसोटीमध्ये पहिल्या डावात १९० तर अभिनव मुकुंदने दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी केली होती.
याबद्दल बोलताना कोहली म्हणाला की केएल राहुल आमचा रुळलेला सलामीवीर आहे त्यामुळे त्याला कमबॅकची संधी मिळणे गरजेचे आहे.
PC: DNA