इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा १४ धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी तिकीट बुक केले. त्याचवेळी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. या सामन्यात दिनेश कार्तिकने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा ठोकल्या. या खेळी दरम्यान त्याने मारलेल्या एका षटकाराने विराट कोहली व विरोधी कर्णधार केएल राहुल यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
विराट राहुल झाले चकीत
दिनेश कार्तिकला दोन धावांवर केएल राहुलने जीवदान दिले होते. त्यानंतर कार्तिकने लखनऊच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आरसीबीच्या डावातील १९ व्या षटकातील दुस-य चेंडूवर कार्तिक स्ट्राइकवर होता. तर वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा गोलंदाजी करत होता. चमीराने लो फुल टॉस चेंडू टाकला. ज्यावर दिनेश कार्तिकने शॉर्ट थर्ड मॅनवरून षटकार मारला. हा फटका पाहून विराटने डगआऊटमधील खुर्चीवरून अक्षरशा उडी मारली. त्याचवेळी, विरोधी कर्णधार केएल राहुलही हा फटका पाहून अचंबित दिसला. या सामन्यात दिनेश कार्तिकने रजत पाटीदारसह शानदार भागीदारी करत आरसीबीला २०० च्या पुढे नेले. रजत ११२ धावांवर नाबाद राहिला आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1529652455721431041?t=gvDPDnLuFjAj9pMwIG1Cmg&s=19
आरसीबीची क्वलिफायर २ मध्ये धडक
पावसाच्या व्यत्ययामुळे काहीसा उशिरा सुरू झालेल्या या एलिमीनेटर सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकला. आरसीबीचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने नाबाद शतक झळकावले. तर, त्याला दिनेश कार्तिकने आक्रमक साथ दिली. प्रत्युत्तरात लखनऊसाठी कर्णधार केएल राहुल व दीपक हुडा यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघेही बाद झाल्यानंतर बाकीच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या पराभवामुळे लखनऊचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर आरसीबी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. गुजरात टायटन्स यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
शतक एक विक्रम अनेक! रजत पाटीदारच्या जबराट सेंच्युरीने पाडला विक्रमांचा पाऊस, टाका एक नजर
“राहुल जबाबदारी उचलण्यास पात्र नाही”; माजी भारतीय क्रिकेटरचे टीकास्त्र
लखनऊने गमावली पदार्पणातील IPL हंगाम गाजवण्याची संधी, ‘या’ ३ चुकांमुळे गमावला Eliminator सामना






