क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं खूपच जुनं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी संसार थाटला आहे. जेव्हाही भारतीय संघाचा सामना असतो, तेव्हा कलाकार मंडळी आवर्जुन सामन्यांना हजेरी लावतात. अशात ज्या क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केले आहे, त्यांचे सामना पाहण्यासाठी येणे साहजिक आहे. अशातच भारत विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 33वा सामना वानखेडे स्टेडिअमवर पार पडला.
मुंबईच्या या ऐतिहासिक स्टेडिअमवर भारतीय संघाने 302 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्याला केएल राहुल (KL Rahul) याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिनेही हजेरी लावली होती. राहुल जेव्हा बाद झाला, तेव्हा अथिया शेट्टीची रिऍक्शन (Athiya Shetty’s Reaction) चर्चेचा विषय ठरली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
अथियाची रिऍक्शन
भारतीय संघाची तिसरी विकेट पडल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. यावेळी राहुलकडून संघाला भरपूर अपेक्षा होत्या, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. भारताच्या डावातील 40वे षटक दुष्मंथ चमीरा टाकत होता. यावेळी त्याच्या दुसऱ्या चेंडूवर राहुल दुशान हेमंथा याच्या हातून झेलबाद झाला. यावेळी राहुलला 19 चेंडूत 21 धावा करून तंबूत परतावे लागले. या खेळीत 2 चौकारांचाही समावेश होता.
फलंदाज बाद झाला, तेव्हा कॅमेऱ्याने स्टँड्समध्ये बसलेली केएल राहुल याची पत्नी अथिया शेट्टी (KL Rahul’s Wife Athiya Shetty) हिचा शोध घेतला. यावेळी अथियाच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. अथियाने यावेळी तिचा हात चेहऱ्यावर ठेवला. तसेच, ती पूर्णपणे शांत झाली. त्याआधी जेव्हा राहुलने चौकार मारले होते, तेव्हा अथियाने जोरजोरात टाळ्या वाजवल्या होत्या. अशात आता अथियाचे यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. अथियासोबत तिचा भाऊ अहान शेट्टीही स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी पोहोचला होता.
Athiya shetty reaction on kl rahul Wicket 😛😌#KLRahul #AthiyaShetty #WorldCup2023 #INDvSL pic.twitter.com/CnlgRhoIuX
— Zumar Baba ❤ (@EnjoyKids492998) November 2, 2023
KL Rahul's wife Athiya Shetty & brother-in-law Ahan Shetty were there at the stadium to support our boys, today in Mumbai. pic.twitter.com/ktKD5o9fG7
— Juman Sarma (@cool_rahulfan) November 2, 2023
राहुलची स्पर्धेतील कामगिरी
राहुलच्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने सुरुवातील चांगली फलंदाजी केली होती. मात्र, सलग 3 सामन्यात सेट होऊन तो बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 27, इंग्लंडविरुद्ध 39 आणि आता या सामन्यात 21 धावांवर बाद झाला. त्याने या स्पर्धेत एकूण 7 सामन्यातील 6 डावात फलंदाजी करताना 79च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, नाबाद 97 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (KL Rahul wife And actress athiya shetty reaction on rahul wicket world cup 2023 ind vs sl)
हेही वाचा-
Video- पत्रकाराने ‘शॉर्ट बॉल’विषयी विचारला प्रश्न, रागाने लाल झाला श्रेयस; म्हणाला, ‘तुम्ही लोकांनीच…’
‘कोहली को बॉल दो’, चालू सामन्यात विराटकडे चाहत्यांची डिमांड, दिग्गजाच्या अंदाजाने जिंकले मन- Video