रोहित शर्माच्या कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. खेळाडू आता त्यांच्या विकेटची पर्वा न करता पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करण्यास तयार आहेत. लवकर आऊट होण्यावर कर्णधारासोबतच खेळाडूंना प्रशिक्षक राहुल द्रविडचाही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. याच प्राकरणात अनेक दिग्गज आणि क्रिकेट जाणकार आपापला दृष्टीकोण व्यक्त करत आहेत.
टीम इंडियाच्या या नव्या रणनीतीशी अनेक खेळाडूंनी जुळवून घेतले आहे, तर विराट कोहलीसारख्या बड्या खेळाडूला अद्याप आक्रमक खेळ करताना मोठी धावसंख्या करता आलेली नाही. या मुद्द्यावर माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर म्हणाले की, “सलामीवीर केएल राहुल विराट कोहलीच्या आधी हा आक्रमक दृष्टिकोन स्वीकारेल. आयपीएलपासून राहुल संघाबाहेर आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेद्वारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “केएल राहुल असाधारण आहे, त्याच्याकडे खेळाचे चांगले तंत्र आहे. तो असा खेळाडू आहे जो १५०चा स्ट्राइक रेट कायम ठेवत सामन्यपणे धावा करतो.”
दुसरीकडे, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली एकत्र येत आहेत का असे विचारले असता, भारतीय चाहत्यांनी आनंद साजरा करावा की काळजी करावी? त्यावर हा माजी भारतीय खेळाडू म्हणाला की, “त्यांनी सेलिब्रेट करावे कारण क्लास परत आला आहे. विराट कोहलीला इंग्लंडमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या नवीन दृष्टिकोनाचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. त्यामुळे त्याला फारसे यश आले नसले तरी त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे श्रेय विराट कोहलीला द्यावे लागेल. इंग्लंडमध्ये धावांची नितांत गरज असल्याने तो धावा करतोय की बाद होतोय याची त्याला पर्वा नव्हती पण तरीही त्याने भारतीय संघाच्या नव्या दृष्टीकोणाला पाठिंबा देत पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न करत होता.”
दरम्यान, केएल राहुल तब्बल ७ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला परत आल्यानंतर लगेचच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दौऱ्यात भारताचे नेतृत्व शिखर धवन करेल असे जाहिर करण्यात आले होते. मात्र आता अचानकपणे धवनकडून जबाबदारी काढून घेत राहुलला सोपावण्यात आली असल्याने सोशल मिडीयावर अनेक विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गांगुलीची ‘दादा’गिरी पुन्हा होणार सुरू! महत्वाच्या सामन्यासाठी टीम इंडिया जाहीर
‘कसोटीत सेटल व्हायलाही न थांबणारा पंत, तिच्यासाठी १० तास थांबेल?’, रिषभ-उर्वशी वादावर मीम्सचा पाऊस
धवनसोबत धोका? केएल राहुल परतल्याने कॅप्टन्सीवरून हाकालपट्टी, अपमानावर भडकले चाहते






