केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला. असे असले तरी, इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका केळताना भारतासाठी यष्टीरक्षकाची भूमिका कोण पार पाडणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात तीन यष्टीरक्षक फलंदाजांना निवडले गेले आहे. मंगळवारी (23 जानेवारी) केएल राहुल या कसोटी मालिकेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार की नाही, याबाबत राहुल द्रविड यांच्याकडून माहिती मिळाली.
इंग्लंड संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. उभय संघांतील पहिला कसोटी सामना 5 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. त्याआदी मंगळवारी (3 जानेवारी) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ सराव करत आहे. अशातच भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडून संघाच्या यष्टीरक्षक फलंदाजाबाबत महत्वाची माहिती मिळाली. द्रविडने सांगितल्याप्रमाणे पाच सामन्यांच्या या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणार नाहीये. इंग्लंडच्याविरुद्धच्या या कसोटीसाठी भारतीय संघात केएल राहुल सोडला तर केएस भरत आणि ध्रव जुरेल या दोन यष्टीरक्षक फलंदाजांना स्थान दिले गेले आहे.
“केएल राहुल या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही. आम्ही संघ निवडतानाच हे स्पष्ट केले आहे. आम्ही इतर दोन यष्टीरक्षकांना निवडले आहे. जाहीर आहे की, केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेमध्ये आमच्यासाठी चांगले काम केले आहे. त्याने मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली. पण पाच कसोटी सामन्यांचा विचार केला, तर संघातील ही भूमिका इतर दोघांपैकी एकाला दिली जाईल.”
दरम्यान, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. भारताचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंत दुखापतीच्या कारणास्तव संघातून बाहेर आहे. असात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला एका स्पेशलिस्ट यष्टीरक्षक फलंदाजीची गरज आहे. पंतच्या अपघातानंतर काही सामन्यांमध्ये केएस भरत याला यष्टीरक्षक म्हणून खेळवले गेले. पण फलंदाजीमध्ये त्याला अपेक्षित योगदान देता आले नव्हते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भरतला अजून एक संधी मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! आयसीसी 2023 वनडे टीमची घोषणा, 11 पैकी 6 खेळाडू भारतीय
ICC Men’s T20I Team of the Year घोषित, सूर्यकुमार यादव बनला कर्णधार, ‘या’ तीन भारतीयांनाही संधी