---Advertisement---

“केएल राहुलचा ‘अलग सफर’ – टीमपासून वेगळी दिशा, बसच्या ऐवजी कारने गाठले हॉटेल!”

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 7:02 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईमध्ये पोहोचला आहे. दुबई विमानतळावरती उतरल्यानंतर केएल राहुल एकटाच हॉटेल पर्यंत पोहोचला. केएल राहुलने इतर खेळाडूंसोबत अंतर ठेवले ; त्याने असे का केले? केएल राहुल संघासोबत हॉटेल मध्ये का नाही गेला?. जेव्हा भारतीय संघ विमानतळावरती उतरला तेव्हा असंख्य चाहते तिथे जमा झाले. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेला भारतीय संघ चाहत्यांच्या गर्दीत अडकला. त्यातूनही भारतीय खेळाडू कसेबसे मार्ग काढत गर्दीतून बाहेर आले.

भारतीय संघातील इतर खेळाडू चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर आले. परंतु, केएल राहुल चाहत्यांच्या घोळक्यात अडकून पडला. यादरम्यान भारतीय संघाने 20 मिनिट केएल राहुलची विमानतळाबाहेर वाट पाहिली पण केएल राहुल त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. म्हणून भारतीय संघ हॉटेल मध्ये जायला निघाला. यानंतर केएल राहुल एकटाच कार ने हॉटेल पर्यंत पोहोचला.

उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ बांग्लादेश विरुद्ध खेळून मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांग्लादेश या दोन संघांमध्ये (20 फेब्रुवारी) रोजी सामना होणार आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तान आणि न्युझीलंड विरुद्ध सामना खेळेल. भारत आणि पाकिस्तानमध्ये (23 फेब्रुवारी) रोजी सामना होणार आहे.यानंतर भारतीय संघ न्युझीलंड संघासोबत (2 मार्च) रोजी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबई मध्ये होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

आयपीएलच्या 17 वर्षांत ‘हे’ 2 संघ सलामीचा सामना खेळण्यापासून वंचित…!

IPL 2025; तिकिटे कधी आणि कशी खरेदी करता येतील? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

IPL 2025; हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सची धुरा कोण सांभाळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---