आजच्या युगात क्रिकेट मैदानावर महिला अँकर बघायला मिळतात. आयपीएल असो किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिथे महिलांची उपस्थिती असते. अशाच एका महिला अँकर सोबत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला आहे. बेन कटिंग असे या खेळाडूचे नाव असून बेनने एरीन हॉलँड या महिला अँकर सोबत त्याने लग्न केलेले आहे.
बेन व एरीन या दोघांनी यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी लग्न केले. कोरोनामुळे या दोघांनी आपले लग्न 2 वेळा पुढे ढकलले होते. मात्र यावर्षी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी दोघे जवळपास 6 वर्ष एकमेकांना ओळखत होते. 2015 मध्ये दोघांची भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली आणि तेव्हापासूनच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर यावर्षी ते लग्नबंधनातही अडकले.
https://www.instagram.com/p/CMWs1PxgqN-/
एरिनने 2013 साली मिस ऑस्ट्रेलिया स्पर्धा जिंकली आहे. तिने मॉडलिंगही केले आहे. तसेच तिला गायनाचीही आवड असून ती इंस्टाग्रामवर याबद्दल पोस्टही करत असते.
https://www.instagram.com/p/CLoVV_nASwW/
मीडिया रिपोर्टनुसार एरीनने शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे आणि तिला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच संगीताची आवड होती. यानंतर तिने डान्स आणि नाटकाचे प्रशिक्षणही घेतले आहे. सनई आणि सॅक्सोफोन सारख्या संगीत वाद्याचे कौशल्य देखील एरीनने आत्मसात केलेले आहे.
https://www.instagram.com/p/CG_93nMgLaC/
विशेष म्हणजे आपल्या करिअरसाठी एरिनने आपले मूळ शहर सोडले होते. तिचा जन्म क्वीन्सलँडमधील केर्न्स येथे झाला होता. संगीत व नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने आपले शहर सोडले आणि ती सिडनी येथे स्थायिक झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गज क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यात ‘हे’ ५ भारतीय खेळाडू करु शकतात पदार्पण
अरर! सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, वाचा सविस्तर