साल १९९० च्या दश्कात भारतीय संघाची परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यात क्षेत्ररक्षण सर्वात कमकुवत होते. तरीही, असे काही खेळाडू होते, ज्यांनी क्षेत्ररक्षणातसुद्धा कमालीची कामगिरी केली आणि यामध्ये सर्वात सरस श्रेत्ररक्षक होता, तो म्हणजे ‘रोबिन सिंग’. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हातचा हा गोलंदाज भारतीय संघात एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला. भारतीय संघासाठी रॉबिन सिंगने आपले महत्वपूर्ण असे योगदान दिले.
रॉबिन सिंगचा जन्म १४ सेप्टेंबर १९६३ साली भारतापासून मैल लांब कॅरेबियन बेटांतील त्रिनिदाद आणि टोबागो येथे झाला. रॉबिन सिंगचे पूर्वज हे राजस्थान, अजमेर येथील होते. १९ वर्षाचा असताना रॉबिन सिंग भारतात मद्रास येथे आला आणि तिथूनच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला आणि अभ्यास करायला सुरुवात केली. दरम्यान, रॉबिन सिंगने मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली.
रॉबिन सिंगने त्याचे प्राथमिक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात तामिळनाडू संघामधून केली. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रॉबिन सिंगला खूप वाट पहावी लागली. दरम्यान, रॉबिन सिंगचं भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण त्याचा जन्मस्थानी म्हणजेच त्रिनिदाद येथे वेस्ट इंडीज विरुद्ध झालं. त्या एकदिवसीय सामन्यानंतर रॉबिन सिंगला पुन्हा संघात परतण्यासाठी ७ वर्षे वाट पहावी लागली.
साल १९९६ ला पुन्हा रॉबिन सिंगची भारतीय संघात निवड झाली, त्यानंतर तो २००१ पर्यंत भारतीय संघात आपले स्थान कायम करून राहिला. रॉबिनने भारतीय संघासाठी खालच्या फळीत फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली भूमिका चोख बजावली. ‘कवर्स’ आणि ‘पॉइंट्’ ह्या क्षेत्ररक्षणाच्या दोन बाजू गाजवल्या.
रॉबिन सिंगची कारकीर्द ही फक्त एकदिवसीय सामन्यांपूर्ती मर्यादित राहिली. कारकिर्दीत त्याने केवळ एकाच कसोटी सामना खेळला त्यात ३२ धावा केल्या. तसेच १३६ एकदिवसीय सामन्यात २३३६ धावा केल्या. ज्याच्या मध्ये १ शतक आणि ९ अर्धशतक सामील आहेत. तसेच, ६९ बळी सुद्धा टिपले आहेत, सोबत २ वेळा डावात ५ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीने आजपर्यंत केले आहे सर्व टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व, पाहा कशी राहिली संघाची कामगिरी
टीव्हीवर ‘त्या’ गोलंदाजाला पाहून वॉर्नरची उडाली झोप; म्हणाला, ‘झोपण्याच्या प्रयत्नात होतो आणि…’
वाढदिवस विशेष: गल्ली क्रिकेटर ते सुलतान ऑफ स्विंग कसा झाला अक्रम?