Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शतकानंतर विराट चुंबन घेत असलेले ते लॉकेट का आहे खास?

March 12, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा पहाड उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक पूर्ण केले. या शतकाचे सेलिब्रेशन करताना त्याने आपल्या गळ्यातील लॉकेटचे चुंबन घेतले. मात्र दरवेळी शतकानंतर विराट चुंबन घेत असलेले लॉकेट नक्की आहे तरी काय? याबाबत आपण जाणून घेऊया.

अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी विराटने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. यादरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 व्या शतकाला गवसणी घातली. यानंतर देखील त्याने आपला खेळ असाच उंचावत भारतातर्फे सर्वाधिक 186 धावांची खेळी केली.

𝟏𝟎𝟎 𝐟𝐨𝐫 𝐊𝐢𝐧𝐠 𝐊𝐨𝐡𝐥𝐢 👑⚡️#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/UXGl32n3WL

— BCCI (@BCCI) March 12, 2023

 

विराटने शतक पूर्ण केल्यानंतर आधी बॅट उंचावून सर्वांचे अभिवादन स्वीकार केले. यानंतर त्याने आपल्या गळ्यातील लॉकेट बाहेर काढत त्याचे चुंबन घेतले. मागील काही काळापासून विराट शतकानंतर सातत्याने त्या लॉकेटचे चुंबन घेताना दिसत आहे. हे लॉकेट म्हणजे त्याची वेडिंग रिंग असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तो आपली पत्नी व मुलगी यांचे स्मरण करत असतो. विराट आपल्या लग्नानंतर अनेकदा शतक झाल्यावर या लॉकेटचे चुंबन घेताना दिसला आहे.

अहमदाबाद कसोटीचा विचार करायचा झाल्यास ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना उस्मान ख्वाजा व कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर 480 धावा उभ्या केल्या. त्यानंतर भारतीय संघातर्फे शुभमन गिल व विराट कोहली यांनी देखील शतके ठोकत भारतीय संघाला 571 धावांची मजल मारून दिली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघासमोर पराभव टाळण्याचे आव्हान असेल.

(Know All About Virat Kohli Locket That He Kiss When Reached Century)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: शमीला पाहून चाहत्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा! पाहा पुढे काय घडले
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम


Next Post
Shakib Al Hasan

विश्वविजेत्या इंग्लंडची नाचक्की! दुबळ्या बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यासह केली टी20 मालिका नावे

Shreyas-Iyer

टीम इंडियासह केकेआरचे वाढले टेन्शन! श्रेयसची दुखापत गंभीर? इतक्या दिवसांसाठी होऊ शकतो बाहेर

Virat kohli

आजारी असतानाही खेळला विराट कोहली? अनुष्काच्या स्टोरीमुळे उंचावली चाहत्यांच्या मनातील प्रतिमा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143