---Advertisement---

चांगली खेळी करण्यामागील हे आहे रहस्य, केएल राहुलने केला खूलासा

---Advertisement---

मंगळवारी (7 जानेवारी) इंदोर येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील (3 Matches of T20I Series) दुसरा सामना पार पडला. हा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) 32 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. त्याचबरोबर हा सामना संपल्यानंतर राहुलने आपल्या खेळीबद्दल त्याचे मत सांगितले आहे.

“मी धावा करत आहे आणि खेळ समजून घेण्याची क्षमता चांगली झाली आहे. तसेच मला माहिती आहे की मी माझी खेळी कशाप्रकारे खेळतो,” असे आपल्या खेळीबद्दल सांगताना राहुल असे म्हणाला.

“मला असे वाटते की यापूर्वी मला असे करता येत नव्हते. मला माहिती होते की माझ्याकडे धावा करण्याची क्षमता आहे आणि फक्त खेळपट्टीवर वेळ घालवल्याने सर्व काही व्यवस्थित होईल,” असेही राहुल यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---