मुंबई । भारतात दरवर्षी आयपीएल क्रिकेट महोत्सवाप्रमाणे आयोजित केले जाते. या लीगचा भाग होण्यासाठी जगभरातील अव्वल खेळाडू भारतात येतात. तथापि, यावर्षी आयपीएललाही कोरोनाव्हायरसचा फटका बसला. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल यावर्षी 19 सप्टेंबरपासून खेळला जाईल. कोरोनाच्या सावटात ही स्पर्धा आयोजित करणे सोपे नाही तरीही बीसीसीआयने चांगली तयारी केली आहे. बीसीसीआयने तयार केलेल्या एसओपीच्या मदतीने खेळाडू आणि लीगला कोरोनाच्या धोक्यापासून दूर ठेवले जाऊ शकते.
एसओपीनुसार, कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येणारा खेळाडू या लीगमधून बाहेर पडणार नाही. त्याच्यात लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल केले जाईल. दोन आठवड्यांनंतर, 24-तासांच्या कालावधीसाठी दोन कोरोना टेस्ट केल्या जातील. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो संघात परत येऊ शकतो. जर त्यांच्यात केवळ सौम्य लक्षणे असतील तर त्या खेळाडूला दोन आठवड्यांसाठी बायो सेक्युर बबलच्या बाहेर रहावे लागेल. यानंतर, तो कार्डियाक स्क्रीनिंग करून परत येऊ शकतो.
खेळाडूंची सहा वेळा कोरोना टेस्ट होईल
बीसीसीआयने आयपीएलसाठी जारी केलेल्या एसओपीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. या नियमांनुसार 20 ऑगस्टनंतर सर्व सहभागी संघ युएईला जाण्यास सुरवात करतील आणि 23 ऑगस्टपर्यंत सर्वजण तिथे पोहोचतील. परदेशी खेळाडू थेट युएईमध्ये दाखल होतील. भारतीय खेळाडूंप्रमाणेच त्यांनाही दोनदा कोविड 19 टेस्ट करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना यूएईमध्ये येता येईल.
संघातील सर्व सदस्य आणि खेळाडूंची विमानतळावरच कोरोना टेस्ट होईल, त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन त्यांना सात दिवस स्वत: ला क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. कोविड टेस्ट सात दिवसांत तीनदा केल्या जातील. एकूण, सहा टेस्ट घेण्यात येतील आणि सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना बायो सिक्योर बबलमध्ये प्रवेश दिला जाईल. या विशेष बबलमध्ये हॉटेल, स्टेडियम, सराव ते टीम बसचा समावेश आहे. आयपीएल दरम्यान कोणत्याही खेळाडूला कुठेही जाऊ दिले जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅप्टन कूल’ धोनीचा स्वॅग पाहिलाय का?, आलिशान गाडीतून पोहोचला एअरपोर्टवर
इंग्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; स्टिव स्मिथ व मिचेल स्टार्कला…
आयपीएलमधील बेंगलोर संघासाठी आदित्य ठाकरे करणार गोलंदाजी
ट्रेंडिंग लेख –
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धू धू धुणारा क्रिकेटर आज कुणाला आठवतही नाही
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…