पहिल्यांदा २००८ साली इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) स्पर्धा खेळवण्यात आली. जगभरातले सगळेच खेळाडू आयपीएलसाठी भारतात आले होते. भारतीय आणि विदेशी खेळाडू मिळून आईपीएलचा एक संघ अशी स्पर्धा सुरु झाली. त्यात ८ वेगवेगळ्या प्रमुख शहरांचे संघ आणि त्यांचे मालक असा एकंदरी आईपीएलचा आढावा तयार करण्यात आला. त्यावर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआई)ने पाकिस्तान संघाला सुद्धा खेळण्यास परवानगी दिली होती.
त्यात ११ पाकिस्तानी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आयपीएल संघांनाही बक्कळ पैसा खर्च करत त्यांना विकत घेतले होते. त्यापुढील हंगामापासून पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली. परंतु त्यांच्यावरील बोलींची किंमत जाणून घेण्याची उत्सुकता आजही सर्वांना असते. तर आपण जाणून घेऊया, २००८ साली आयपीएल संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना किती रुपयांना विकत घेतले होते.
सलमान बट
माजी पाकिस्तानी फलंदाज सलमान बट पहिल्या मोसमात कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. त्याने कोलकत्ता संघासाठी फक्त ७ सामने खेळले. त्यात ७ सामन्यात त्याने १९३ धावा केल्या. त्या मोसमात सलमान बटला कोलकत्ता फ्रेंचाइजीने त्याला ४.१६ लाखात विकत घेतले होते.
शाहीद आफ्रिदी
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी लांब लांब षटकार खेचण्यात पटाईत होता. तसेच वेळ आल्यास तो गोलंदाजीही करत असे. आफ्रिदीने आपला पहिला आईपीएलचा सामना डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता. आफ्रिदी पहिल्या मोसमात पैश्यांनी मालामाल झाला होता. हैदराबाद फ्रेंचाइजीने आफ्रिदीवर तब्बल २.७१ करोड खर्च केले होते.
शोएब अख्तर
रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध शोएब अख्तर आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी अतिशय विख्यात होता. शोएब अख्तरसारखा गोलंदाज आपल्या संघात हवा म्हणून कोलकत्ता फ्रेंचाइजीने त्याला १.७० कोटींमध्ये विकत घेतले होते. शोएबने २००८च्या हंगामात सुंदर गोलंदाजी केली होती.
मोहम्मद हाफीज
मोहम्मद हाफीज सुद्धा कोलकत्ता संघाचे प्रतिनिधित्व करत होता. मोहम्मद हाफीज मधल्या फळीत फलंदाजी करत असे. सलमान बट आणि मोहम्मद हाफीज यांचा पगार जवळ जवळ सारखाच होता. कोलकत्ता फ्रेंचाइजीने त्याला ४०.१६ लाखात विकत घेतले होते.
उमर गुल
आईपीएल 2008 मध्ये कोलकाता नाइट राइडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना उमर गुलने सुंदर गोलंदाजी केली होती. २००७च्या टी -२० विश्वचषकात त्याने घातक गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याचावर खूप संघांची बोली लागली होती. शेवटी त्याला कोलकत्ता फ्रेंचाइजीने ६०.२४ लाखात विकत घेतले.
मिस्बाह उल हक
माजी पाकिस्तानी कर्णधार मिस्बाह उल हक याने २००७च्या टी-२० विश्वचषक सामन्यात अफलातून फलंदाजी केली होती. त्यामुळे मिस्बाह उल हकलासुद्धा खूप संघानी बोली लावली होती. पहिल्या हंगामात मिस्बाह उल हक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला. त्याला बेंगलोर फ्रेंचाइजीने ५०.२ लाखात विकत घेतले.
कामरान अकमल
आईपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा कामरान अकमल एक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत खेळला. राजस्थान फ्रेंचाइजीने त्याला ६० लाखात आपल्या संघात घेतले होते.
यूनिस खान
पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज यूनिस खान, आईपीएलचा पहिला हंगामा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. परंतु, राजस्थान संघाने त्याला केवळ एक सामना खेळून बाहेर बसवले. त्या सामन्यात त्याने केवळ ३ धावा केल्या. राजस्थान फ्रेंचाइजीने त्याला ९०.६० लाखात आपल्या संघात घेतले होते.
मोहम्मद आसिफ
पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज मोहम्मद आसिफने पाकिस्तान संघासाठी आईपीएलपूर्वी खूप सुरेख कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला दिल्ली डेयरडेविल्ल्स संघाने आपल्या संघात घेतले होते. आईपीएलमध्ये मोहम्मद आसिफने ८ सामने खेळले. त्याला दिल्ली फ्रेंचाइजीने तब्बल २.६१ करोड इतके पैसे मोजले होते.
शोएब मलिक
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मालिक त्या वेळेस दमदार फॉर्ममध्ये होता. टी-२० सामन्यात त्याचे प्रदर्शन खूपच चांगले राहिले होते. त्यामुळे त्याला सुद्धा दिल्ली डेयरडेविल्ल्स संघाने आपल्या संघात घेतले होते. शोएब मलिक मधल्या फळित फलंदाजी करत असे आणि गरजेला ऑफ स्पिन गोलंदाजी सुद्धा करत असे. त्याला दिल्ली फ्रेंचाइजीने तब्बल २ करोड इतके पैसे मोजले होते.
सोहेल तनवीर
आईपीएलच्या पहिल्याच सामन्यात पर्पल कॅप विजेता सोहेल तनवीर २००८ साली राजस्थान संघातून खेळला. राजस्थान फ्रेंचाइजीने त्याला ४०.१६ लाखात आपल्या संघात घेतले होते. त्यावर्षी सोहेल तनवीरने २२ गडी बाद केले. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी १४ धावा देऊन ६ गडी बाद अशी होती.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा, कोहली की विलियम्सन, WTC Finalमध्ये कोण घालणार धावांचा रतीब? दिग्गजांनी दिली उत्तरे
धोनीला संघाबाहेर करणाऱ्या माजी निवडकर्त्याने भाष्य; म्हणे, ‘दिग्गजांविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात’
तीन वर्षांपासून कोणत्याही संघाला जमले नाही ते भारतीय संघ करणार?