---Advertisement---

तीन वर्षांपासून कोणत्याही संघाला जमले नाही ते भारतीय संघ करणार?

On: मंगळवार, जून 8, 2021 4:20 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ जवळपास तीन महिन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर होईल. या ऐतिहासिक सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत इंग्लंडला लॉर्ड्स कसोटीत पराभूत करून एक खास कामगिरी आपल्या नावे जमा करुन घेण्याची सुवर्णसंधी विराट कोहलीच्या संघाकडे असेल.

भारताकडे आली ‘ही’ संधी
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. इंग्लंडने या मैदानावर २००६ ते २०१२ या काळात एकही कसोटी सामना गमावला नव्हता. इंग्लंडला या मैदानावर अखेरचा पराभव २०१८ मध्ये पाहावा लागला होता. त्यावेळी पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत केलेले. त्यानंतर आता तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीत ते या मैदानावर एकदाही पराभूत झाले नाहीत.

सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर पार पडला. पाहुण्या न्यूझीलंडने या सामन्यावर वर्चस्व गाजवले. मात्र, त्यांना विजय मिळविण्यात अपयश आले. सामन्यातील तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला व अखेरच्या दिवशी सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे न्यूझीलंडला लॉर्ड्सवर विजय मिळवता आला नाही. आता भारतीय संघाकडे इंग्लंडला लॉर्ड्सवर पराभूत करण्याची संधी चालून आली आहे.

लॉर्ड्सवर २०१४ मध्ये मिळवलेला विजय
भारतीय संघाने या मैदानावर आपला अखेरचा कसोटी विजय २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात मिळवलेला. अजिंक्य रहाणेचे शतक व ईशांत शर्माची भेदक गोलंदाजी या सामन्याचे वैशिष्ट राहिलेले. भारताने याच मैदानावर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वचषक व सौरव गांगुलीच्या नेतृत्वात २००२ नेटवेस्ट ट्रॉफी जिंकलेली.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडचा सैरसपाटा वा अजून काही! कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर विराटसेनेला मिळणार मोठी सूट

आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून

टी१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचा कहर विक्रम, अवघ्या २८ चेंडूत झळकावले तूफानी शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---