---Advertisement---

…म्हणून विराट कोहलीने केला चार दिवसीय कसोटीसाठी विरोध

---Advertisement---

आयसीसी (ICC) कसोटी सामने 5 दिवसांऐवजी 4 दिवस (4 days of test series instead of 5 days) करण्याचा विचार करत आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी या कल्पनेचा विरोध केला आहे. विराट म्हणाला, मी खेळाच्या पारंपारिक पाच दिवसीय स्वरूपात बदल करण्याच्या विरोधात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व्यस्त वेळापत्रकातील वेळ वाचवण्याच्या दृष्टीने 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने चार दिवसीय करण्याचा विचार करीत आहे. पंरतू आता फक्त प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा स्वरूप आजमवण्याची इच्छा व्यकत केली आहे.

मात्र अनेक क्रिकेटपटूंनी यासाठी विरोध केला आहे. अनुभवी गोलंदाज नॅथन लायन यांनी याला ‘हास्यास्पद’ म्हटले आहे. तसेच कोहलीने श्रीलंकेविरुद्ध रविवारी होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याच्या आधी शनिवारी संध्याकाळी पत्रकारांना सांगितले की, ‘माझ्या मते, पारंपारिक पाच दिवसीय स्वरूपात छेडछाड होऊ नये.’

विराट म्हणाला, ‘मी म्हटल्याप्रमाणे, दिवस- रात्र कसोटी सामना क्रिकेटच्या व्यवसायीकरणाकडे आणखी एक पाऊल आहे. यासाठी रोमांच तयार करणे ही वेगळी गोष्ट आहे पण त्यात जास्त छेडछाड करता येणार नाही. माझा यावर विश्वास नाही. ‘ 

नुकतीच भारताने दिवस- रात्र कसोटी खेळली आणि कोहलीला पाच दिवसांच्या स्वरूपामध्ये फक्त हा एक बदल पहायचा आहे. तो म्हणाला, “माझ्या मते, कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दिवस- रात्र कसोटीमध्ये बदल करणे खूप आहे.’

कोहली म्हणाला, ‘तुम्ही फक्त चाहत्याची संख्या, मनोरंजन वगैरे गोष्टी बोलत आहात. मला वाटत की मग तुमची इच्छा योग्य ठरू शकणार नाही कारण त्यानंतर तुम्ही तीन दिवसांच्या कसोटीविषयी चर्चा कराल. म्हणजे हे सर्व कधीही संपणार नाही. मग तुम्ही म्हणाल की कसोटी क्रिकेट नामशेष होत आहे.’

‘म्हणून मी याच्या समर्थनात नाही. मला असे वाटत नाही की खेळाच्या पारंपारिक स्वरूपासाठी हे योग्य आहे. सुरुवातीला क्रिकेट कसे सुरू झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच दिवसीय कसोटी ही सर्वोत्कृष्ट आहे.’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---